दोन महामार्गातून रिंगरोड मागणीला जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:44 IST2019-09-15T11:44:03+5:302019-09-15T11:44:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गाअंतर्गत नंदुरबारसाठी रिंगरोड प्रस्तावीत करावा. सध्या असलेला बायपास रोड हा अध्र्याभागापुरता मर्यादीत असल्यामुळे ...

Emphasis on the demand for ringroads from two highways | दोन महामार्गातून रिंगरोड मागणीला जोर

दोन महामार्गातून रिंगरोड मागणीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गाअंतर्गत नंदुरबारसाठी रिंगरोड प्रस्तावीत करावा. सध्या असलेला बायपास रोड हा अध्र्याभागापुरता मर्यादीत असल्यामुळे निम्मे शहराचा विकास खुंटला आहे. रिंगरोड झाल्यास अनेक भागातील अंतर कमी होऊन शहरातील रहदारीची समस्या देखील मोठय़ा प्रमाणावर सुटणार आहे.   
नंदुरबारातून विसरवाडी-सेंधवा, शेवाळी-नेत्रंग या दोन महामार्गासह धरणगाव ते धानोरा हा राज्य महामार्ग जातो. याशिवाय पश्चिम रेल्वेच्या सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील मध्यवर्ती स्टेशन असल्यामुळे या ठिकाणी रहदारीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय नागपूर-सुरत किंवा अंकलेश्वर-ब:हाणपूर महामार्गावर काही समस्या उद्भवल्यास नंदुरबार मार्गे वाहतूक वळविली जाते. जड वाहनांची ये-जा वाढत आहे. या पाश्र्वभुमीवर शहरातील रहदारीचा ताण वाढला आहे. या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात रिंगरोड तयार केल्यास रहदारीच्या समस्येवर मात करण्यास दमत मिळणार आहे. सध्या केवळ एक वळण रस्ता आहे. नवापूर चौफुली ते निझर रस्ता चौफुलीर्पयत हा वळण रस्ता आहे. तो देखील आता शहराच्या मध्यभागी आला आहे. 
सध्या प्रस्तावीत असलेल्या शेवाळी-नेत्रंग महामार्ग हा नंदुरबारातून जाणार आहे. त्याअंतर्गत पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानापासून ते एकलव्य इंग्रजी शाळा, माळीवाडा मार्गे निझर रस्ता. तेथून पातोंडा शिवारातून चौपाळे शिवार, सिव्हील हॉस्पीटलच्या मागून साक्री अर्थात नेत्रंग-शेवाळी रस्त्याला जोडणारा रिंग रोड अपेक्षीत आहे. 
तसे झाल्यास सिव्हील हॉस्पीटल, प्रस्तावीत मेडीकल कॉलेज, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, एमआयडीसी आदी भाग हा नेत्रंग-शेवाळी महामार्गावर अर्थात एनएच-753 महामार्गावर येणार आहेत. 
उड्डाणपूल, वळण रस्त्यावरील वाहतूक कमी होणार आहे. यासाठी मात्र, लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे अपेक्षीत आहे. 

दोन्ही महामार्ग शहरातून जात असल्यामुळे सध्या अस्तीत्वात असलेल्या वळण रस्त्यावर रहदारीचा ताण येणार आहे. सध्या या रस्त्याच्या पलिकडेही मोठय़ा प्रमाणावर नागरी वस्ती वाढली आहे. शाळा आहेत. त्यामुळे महामार्ग शहरातून न नेता शहराबाहेरून न्यावा यासाठी जनआंदोलनाची गरज आहे.
 

Web Title: Emphasis on the demand for ringroads from two highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.