अपहार करणाऱ्या लिपीकास एक वर्ष कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:55 IST2020-11-01T12:55:40+5:302020-11-01T12:55:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तहसीलदाराचे खोटे देयक तयार करून २९ लाखांचा अपहार करणाऱ्या उप कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक ...

अपहार करणाऱ्या लिपीकास एक वर्ष कैद
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तहसीलदाराचे खोटे देयक तयार करून २९ लाखांचा अपहार करणाऱ्या उप कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदल महारु जाधव (बंजारा) यास चार वर्षे शिक्षा व चार हजार रुपये दंड तर बँक कर्मचारी विनय किशनसिंह रावत यास एक वर्ष शिक्षा व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. जिल्हा सत्र न्यायालयाने आज या खटल्याची सुनावणी केली. न्या.व्ही.जी. चव्हाण यांनी हा निकाल दिला. अशी माहिती पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी दिली.
नवापूर शहरातील उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) यानी ११ जून २०१८ रोजी उप कोषागार कार्यालयातील संगणक प्रणालीत तहसीलदार नवापूर यांचे खोटे देयक तयार करून त्यात खाडाखोड करून स्वतःचे नाव टाकून बँकेच्या सुचना पत्रकावर उप कोषागार अधिकारी नवापूर यांच्या खोट्या स्वाक्षरी केली होती. बॅकेचे सुचना पत्रक भारतीय स्टेट बँकच्या नवापूर शाखेत सादर करून शासनाच्या तिजोरीतून २९ लाख रूपये स्वताच्या खात्यात जमा करून घेतले होते. इंदल जाधव हा कनिष्ठ लिपिक असून त्यास नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) याच्या विरोधात अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश बांधकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबत स्टेट बँक प्रशासन विरुद्ध हि तक्रार दिली आहे.
कसा झाला प्रकार
जाधव यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेले एकूण २९ लाख रुपयांमधून त्यांनी ११ जून २०१८ रोजी एटीएम मधून ४० हजार रूपये काढले. त्यानंतर १२ जून २०१८ रोजी बँकेच्या खिडकी वरून २५ लाख रूपये व त्याच दिवशी एटीएम मधून ४० हजार काढले. असे २५ लाख ८० हजार रूपये काढून घेतले. उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा आहेत. दोन दिवसानंतर बँकेच्या अहवाल आल्याने उप कोषागार संजय गोविंद साळी यांनी कागद पत्रांची तपासणी करीत असतांना २९ लाखांचा अपहार झाल्याचे लक्षात आले.
काढलेल्या रकमेपैकी तीन लाख ६६ हजार कमी आढळून आले. उर्वरित रक्कमेचे खाते बंद केले आहे. त्यावरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलिस हेड कॉनस्टेबल दिलीप चौरे, जितेंद्र तोरवणे, योगेश थोरात, शांतीलाल पाटील, महेश पवार यांनी केला.