भादवड येथे कर्मचारी महिलेस शिवीगाळ
By Admin | Updated: June 17, 2017 18:02 IST2017-06-17T18:02:12+5:302017-06-17T18:02:12+5:30
महिलेच्या कामात अडथळा आणून दमदाटी करणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े

भादवड येथे कर्मचारी महिलेस शिवीगाळ
ऑनलाईन लोकमत
नंदुरबार, दि. 17 - ग्रामविकासाचे सव्रेक्षण करणा:या मुख्यमंत्री ग्रामविकास दूत कर्मचारी महिलेच्या कामात अडथळा आणून दमदाटी करणा:याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े नवापूर तालुक्यातील भादवड येथे ही घटना घडली़
मुख्यमंत्री ग्रामविकास दूत आरती बाळासाहेब मोरे रा़ मळगाव ता़ भडगाव जि़ जळगाव ह्या नवापूर तालुक्यातील भादवड येथे प्रभाग क्रमांक एक मध्ये गुरूवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सव्रेक्षण करत असताना हिरामण रूपसिंग पाडवी याने त्यांना दमदाटी करून शिविगाळ केली़ तसेच यावेळी त्यांच्या हातातील शासकीय टॅब व चाजर्र हिसकावून फेकून दिल़े संबधित कर्मचारी गाव विकासाचा सव्रे करत असल्याचा राग संशयित पाडवी याचा होता़ याबाबत आरती मोरे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात हिरामण पाडवी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े