ईको डिङोल पंप देण्याच्या अमिषाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:18 IST2019-06-12T12:18:22+5:302019-06-12T12:18:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ईको डिङोल पंप सुरु करण्याचे अमिष दाखवत शहादा येथील तिघांची 30 लाख रुपयात फसवणूक ...

ईको डिङोल पंप देण्याच्या अमिषाने फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ईको डिङोल पंप सुरु करण्याचे अमिष दाखवत शहादा येथील तिघांची 30 लाख रुपयात फसवणूक झाली़ 2017 मध्ये तिघांनी गुंतवणूक म्हणून मुंबई येथील कंपनीसोबत संपर्क केला होता़ त्यानंतर हा प्रकार घडला़
मुंबई येथील माय ओन ईको इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे शहादा येथील दिनेश राजाराम पाटील, विजय श्रीकृष्ण पाटील व प्रितेश विजय पाटील यांनी ईको डिङोल पंपासाठी संपर्क केला होता़ कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातून तिघांसोबत वारंवार संपर्क करुन वेळावेळी पैश्यांची मागणी करण्यात आली होती़ यानुसार 30 जानेवारी 2017 ते 31 मे 2017 या कालावधीत तिघांना वेगवेगळ्यात खात्यातून व्यवहार करत 30 लाख सहा हजार रुपये संबधित कंपनीच्या खात्यात वर्ग केले होत़े यानंतर ईको डिङोल पंप निर्धारित करुन देण्यात आलेल्या सुरु करण्याचे सांगण्यात आले होत़े परंतू पाच महिने उलटूनही कारवाई न झाल्याने तिघांनी संबधित कंपनीच्या मुंबई आणि पुणे येथील कार्यालयात संपर्क केला होता़ परंतू तेथेही योग्य ते उत्तर मिळाले नाही, यामुळे फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिघांनी पोलीसात धाव घेतली़ याबाबत सोमवारी सुनिल काशीनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंपनीचा संचालक संतोष वर्मा अलुरी, सचिन साहेबराव लबाडी, जयंत जगन्नाथ केसरकर, सारिका अनिरुद्ध शिंदे, समर करंके, सतिष बुरले, शहानवाज उर्फ शेहबाज खान, प्रशांनी अतुकुरी, आनंद आऱ दातला आणि किशोरसिंग या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े शहादा तालुक्यात यापूर्वी संबधित कंपनीने एकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यानंतर तिघांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आह़े
मुंबई येथे तिघांना संबधित कंपनीचा कर्मचारी घेऊन गेला होता़ त्याठिकाणी संचालक म्हणवून घेणा:यांनी सहा महिन्यात डिङोल पंप सुरु करुन देण्याचे सांगितले होत़े परंतू सहा महिने उलटूनही त्यांनी कामकाज न केल्याने फसवणूक झालेल्या तिघांनी तपास केला होता़ दरम्यान, संबधित संशयितांनी फोन बंद करुन ठेवले होत़े