शेततळे योजनेसाठी पात्र लाभार्थींनी अर्ज सादर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST2021-03-04T04:59:18+5:302021-03-04T04:59:18+5:30

या योजनेसाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा. वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे किंवा अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असावा. लाभार्थ्यांकडे एक हेक्टर ...

Eligible beneficiaries should submit application for farm scheme | शेततळे योजनेसाठी पात्र लाभार्थींनी अर्ज सादर करावे

शेततळे योजनेसाठी पात्र लाभार्थींनी अर्ज सादर करावे

या योजनेसाठी शेतकरी अनुसूचित जमातीचा असावा. वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे किंवा अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असावा. लाभार्थ्यांकडे एक हेक्टर जमीन व सिंचनाची सोय असावी. अर्जासोबत पासपोर्ट फोटो, जातीचा, उत्पन्नाचा व रहिवासी दाखला, फोटो, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, यापूर्वी इतर योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला, ग्रामसभेचा ठराव जोडावा. तसेच योजना पूर्ण केल्यानंतर ती टिकवून काळजी घेण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आवश्यक राहील. या योजनेसाठी विधवा, परित्यक्त्या, महिला, अपंग लाभार्थी यांना प्राधान्य देण्यात येईल. तसा दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक असेल. इच्छुकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नवापूर रोड नंदुरबार येथे १५ मार्चपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी दिली.

Web Title: Eligible beneficiaries should submit application for farm scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.