लिफ्ट अडकली तांत्रिक मान्यतेच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:17 IST2020-03-17T12:17:31+5:302020-03-17T12:17:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या नवीन लिफ्टच्या बांधकामासाठीचे तांत्रिक अंदाजपत्रक पुणे येथे विद्युत विभागाकडे अडकले ...

The elevator is stuck in the shackles of technical assumptions | लिफ्ट अडकली तांत्रिक मान्यतेच्या कचाट्यात

लिफ्ट अडकली तांत्रिक मान्यतेच्या कचाट्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या नवीन लिफ्टच्या बांधकामासाठीचे तांत्रिक अंदाजपत्रक पुणे येथे विद्युत विभागाकडे अडकले आहे. प्राथमिक स्तरावरील सर्व काम पुर्ण झाले आहे. इमारतीला १८ वर्षानंतर लिफ्ट मंजूर झाली आहे.
जिल्हा प्रशासकीय इमारतीचे काम करतांना लिफ्टची सोय कुठेही करण्यात आली नव्हती. चार मजली इमारत असतांना व दोन्ही प्रशस्त इमारतीमुळे कार्यालये शोधणे आणि तेथे पोहचण्यासाठी सर्वसामान्यांसह दिव्यांगांचीही मोठ्या प्रमाणावर परवड होते. त्यासाठी इमारतीला लिफ्टची सोय करावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. इमारत बांधकाला १८ वर्ष झालेली असतांनाही लिफ्टची सोय होत नव्हती. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी इमारतीमधील आतील स्ट्रक्चर बदलवून बऱ्यापैकी लूक दिला आहे. याच अंतर्गत लिफ्ट देखील मंजुर करून घेतली. गेल्या सहा महिन्यांपासून त्याचे बांधकाम करण्यात येत असले तरी अद्यापही ते पुर्ण झाले नाही.
लिफ्टची एकुण अंदाजीत रक्कम एक कोटी ९७ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. यासाठी विद्युत विभागाची तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक असते. तसे तांत्रिक अंदाजपत्रक नाशिक विभाग विद्युत विभागाला पाठविण्यात आले होते. परंतु तेथून ते पुणे येथील वरिष्ठ कार्यालयात गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी ते मंजूर झाले किंवा नाही याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
यामुळे लिफ्टचे काम अडकले आहे. तांत्रिक मंजुरी मिळाली तर लागलीच हे काम पुर्ण होणार आहे. यामुळे नागरिकांची, येथे कामे घेवून येणाºया सर्वसामान्यांची, वृद्ध व दिव्यांगांची मोठी सोय होणार आहे.

Web Title: The elevator is stuck in the shackles of technical assumptions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.