वीज कर्मचा:यांना शहाद्यात बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:04 IST2019-03-24T21:04:43+5:302019-03-24T21:04:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वीज बील थकल्यामुळे पुरवठा खंडीत करण्यास गेलेल्या वीज कर्मचा:यांना वीट व लाकडी दांडक्याने मारून ...

वीज कर्मचा:यांना शहाद्यात बेदम मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वीज बील थकल्यामुळे पुरवठा खंडीत करण्यास गेलेल्या वीज कर्मचा:यांना वीट व लाकडी दांडक्याने मारून जखमी केल्याची घटना शहाद्यातील हरीओम नगरात घडली. शहादा पोलिसात मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या मार्च अखेर असल्यामुळे वीज कंपनीतर्फे वसुलीची मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत शहादा येथील हरीओम नगरात राहणारे मनोहर हरिश्चंद्र ईदाहत यांच्याकडे वीज बील बाकी होते. थकबाकीमुळे वीज कर्मचारी स्वप्नील निंबा बागले हे त्यांच्या घराचा वीज पुरवठा खंडीत करण्यासाठी गेले. यावेळी ईदाहत यांनी बागले यांच्याशी वाद घातला. संतापाच्या भरात त्यांनी वीट मारून पायाला दुखापत केली. बागले यांच्यासोबत असलेले राजेश ओंकार खैरनार यांना देखील लाकडी दांडक्याने मारहाण केली.
याबाबत स्वप्नील बागले यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने मनोहर ईदाहत यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणने व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शेख करीत आहे.