वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचा:यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 11:51 IST2019-10-11T11:51:21+5:302019-10-11T11:51:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील फकीर मोहल्ला परिसरात बील वसुलीसाठी गेलेल्या विज कर्मचा:यास मारहाण तिघांनी मारहाण केल्याची घटना ...

वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचा:यास मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील फकीर मोहल्ला परिसरात बील वसुलीसाठी गेलेल्या विज कर्मचा:यास मारहाण तिघांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली़ घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वीज कंपनीच्या वसुली मोहिमेदरम्यान हा प्रकार घडला़
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी योगेश आनंद लांडगे हे गुरुवारी सकाळी वीज कंपनीच्या पथकासह फकीर मोहल्ला परिसरात वीज बिल वसुलीसाठी गेले होत़े दरम्यान एके ठिकाणी बिलाबाबत विचारणा करत असताना तौसिफ, आसिफ सलाउद्दीन आणि जावेद (पूर्ण नाव माहित नाही) या तिघांनी हुज्जत घालून लांडगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी पथकातील कर्मचारी व परिसरातील नागरिक धावून आल्याने पुढील अनर्थ टळला़ याबाबत योगेश लांडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
सकाळी घडलेल्या घटनेनंतर वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचा:यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत संशयितांना अटक करण्याची मागणी केली होती़ पोलीसांनी गुन्हा दाखल करुन संशयित आरोपींची चौकशी केली होती़