वीज पडून सैताणे येथे वृद्ध ठार

By Admin | Updated: June 3, 2017 18:02 IST2017-06-03T18:02:46+5:302017-06-03T18:02:46+5:30

येथील जामसिंग रामसिंग भिल (60) या वृद्धाचा मृत्यू झाला.

Electricity hit elderly in Saita | वीज पडून सैताणे येथे वृद्ध ठार

वीज पडून सैताणे येथे वृद्ध ठार

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 3 -  शेळ्य़ा चारून घराकडे परत येत असताना वीज कोसळून सैताणे येथील जामसिंग रामसिंग भिल (60) या वृद्धाचा मृत्यू झाला. 
 सायंकाळी नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात विजांसह तुरळक पाऊस झाला. सैताणे येथील जामसिंग  भिल हे शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने ते गावालगतच्या जगतराव टेकडीवर थांबले असता त्यांच्या अंगावर वीज पडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत हिरामण भिल यांनी खबर दिल्याने तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
   

Web Title: Electricity hit elderly in Saita