चिंचपाडा रुग्णालयास वीजतारांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:13 IST2020-03-24T12:12:55+5:302020-03-24T12:13:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : मानवी जीवनाला आधारभूत ठरणाऱ्या चिंचपाडा ता. नवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून वीजेच्या तारा ...

चिंचपाडा रुग्णालयास वीजतारांचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : मानवी जीवनाला आधारभूत ठरणाऱ्या चिंचपाडा ता. नवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून वीजेच्या तारा टाकण्यात आल्या आहे. परंतु त्या लोंबकळल्याने संपूर्ण आरोग्य केंद्रासह जीवाच्या आकांताने उपचारासाठी येणाºया रुग्णांनाही धोका निर्माण झाला आहे.
नवापूर तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावांमधील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या, महिला व बालकांनाही आवश्यक त्या योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी चिंचपाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या रुग्णालयामार्फत आरोग्याच्या प्राथमिक सुविधा पुरविल्या जात आहे, तर महिला व बाल विकास विभागांर्तगत गरोदर, स्तनदा माता व पाच वर्षाखालील लाभार्थी बालकांना विविध योजनांचा लाभही दिला जातो. त्यामुळे हे रुग्णालय या १५ गावांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. परंतु या रुग्णालयाच्या आवारातून वीज वितरणमार्फत वीजेच्या तारा टाकण्यात आल्या आहे. या विजतारा रुग्णालय परिसरात अनेक महिन्यांपासून लोंबकळत आहे. या तारा दुरुस्तीकडे वीज वितरण यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे संपूर्ण रुग्णालयाला धोका निर्माण झाला आहे. पर्यायाने तेथे उपचारासाठी येणाºया रुग्णांचा जीवही धोक्यात असल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे.
अशा संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी वीज वितरणमार्फत या तारांची पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा निदान त्यांची दुरुस्ती तरी करण्यात यावी, अशी मागणी रुग्ण, रुग्णांचे पालक, रुग्णालयातील कर्मचारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वीज प्रवाह बंद करीत फडवला जातो ध्वज
रुग्णालयाच्या आवारातून गेलेल्या वीजतारा रुग्णालयासाठी तयार करण्यात आलेल्या झेंडावंदनाच्या खांब्याला लागून आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी वीज खंडीत केली जात नसल्याने हा खांब्याचा रुग्णालयाच्या आवारात जाणाºया प्रत्येक व्यक्तीला नेहमीच धोका निर्माण झाला आहे. झेंडावंदनाच्या कार्यक्रम राहिल्यास त्या तारांमधील वीज प्रवाह बंद करण्यात येतो. ही बाब प्रशासनासह नागरिकांसाठी देखील एक मोठी शोकांतिका ठरत आहे.