नवापुरात वीज बिलांची टप्प्याटप्प्याने वसुली करावी, शिवसेनेचे वीज उपअभियंत्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST2021-07-31T04:31:09+5:302021-07-31T04:31:09+5:30
निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाले होते. काही कालावधीपासून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर ...

नवापुरात वीज बिलांची टप्प्याटप्प्याने वसुली करावी, शिवसेनेचे वीज उपअभियंत्यांना निवेदन
निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षापासून संपूर्ण देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाले होते. काही कालावधीपासून हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मध्यंतरीच्या काळात लोकांना व्यवसाय नसल्याने तसेच लॉकडाऊन कालावधीमध्ये बाहेर निघणेदेखील मुश्किल झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थितीही खालावली आहे. वीज वितरण कंपनीकडून अंदाजित अवाजवी बिले ग्राहकांना देण्यात आलेली आहेत. तसेच त्यांच्याकडून एकरकमी वसुली करण्याचा तगादा वीज वितरण कंपनीकडून लावण्यात येतअसल्यामुळे ग्राहकांना बिल एकरकमी भरणे शक्य होत नाही व बिल न भरल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम वीज वितरण कंपनीकडून सध्या सुरु आहे. संबंधित खाजगी ठेकेदाराकडून मीटरचे रिडींग नियमित घेत नसल्याने तसेच अंदाजित बिलेदेखील वेळेवर न मिळाल्याने ग्राहकांना वाढीव अवाजवी रक्कम भरणा करणे शक्य होत नाही. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी व ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित न करता त्यांना प्राप्त झालेल्या बिलात टप्पे करुन त्यांच्याकडून बिल वसुली करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, मनोज बोरसे, गोविंद मोरे, अनिल वारुडे, रवी सोनवणे, किशन शिरसाठ आदींच्या सह्या आहेत.