वीज अभियंते लाक्षणिक संपावर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:35 IST2021-08-25T04:35:47+5:302021-08-25T04:35:47+5:30
निवेदनात म्हटले आहे की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती वीज क्षेत्रात काम करणारे अभियंते महत्त्वाचे घटक असताना शिवाय वादळ, पाऊस, ...

वीज अभियंते लाक्षणिक संपावर जाणार
निवेदनात म्हटले आहे की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती वीज क्षेत्रात काम करणारे अभियंते महत्त्वाचे घटक असताना शिवाय वादळ, पाऊस, नैसर्गिक आपत्ती, कोरोना परिस्थितीत रात्रंदिवस काम करत असताना त्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. अनेकवेळा चर्चा करण्यात आल्या पण प्रशासनाने दुर्लक्ष करून उदासीनता दाखवली आहे. म्हणून आमच्या मागण्यांसाठी एक दिवस लाक्षणिक संपावर जात आहेत, असे म्हटले आहे. महापारेषण कंपनीतील एकतर्फी लादलेल्या अभियंत्यांच्या स्टॉप सेअप करावा, महावितरण कंपनीतील आवश्यक रिक्त पदे ही संकल्पना रद्द करण्यात यावी, रखडलेल्या बदल्यांबाबत प्रश्न मार्गी लावावा, तिन्ही कंपनीतील पदोन्नतीबाबत प्रश्न सोडवावा २०१५ पासून हा प्रश्न प्रलंबित आहे, एकतर्फी बदली धोरण राहू नये, कंपनीतील अधिकारी-कर्मचारी वीज बिल वसुलीसाठी जात असताना अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यांना लोकसेवकाचा दर्जा मिळावा यासह अन्य मागण्या निवेदनात केल्या आहेत.