कारची विद्युत रोहित्राला धडक सुदैवाने जिवीतहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:49 IST2019-03-31T11:49:32+5:302019-03-31T11:49:50+5:30

ब्राम्हणपुरी/म्हसावद : भरधाव कार विद्युत रोहित्राला धडकली, मात्र सुदैवाने कारमध्ये विद्युत प्रवाह न उतरल्याने चालक बालंबाल बचावल्याची घटना लोणखेडा, ...

The electric power of the car Rohilla is not well-intentioned | कारची विद्युत रोहित्राला धडक सुदैवाने जिवीतहानी टळली

कारची विद्युत रोहित्राला धडक सुदैवाने जिवीतहानी टळली

ब्राम्हणपुरी/म्हसावद : भरधाव कार विद्युत रोहित्राला धडकली, मात्र सुदैवाने कारमध्ये विद्युत प्रवाह न उतरल्याने चालक बालंबाल बचावल्याची घटना लोणखेडा, ता.शहादा येथे घडली. अपघातात कारने दोनवेळा उलटली तरीही चालकाला किरकोळ खरचटण्यावर निभावले.
सुलवाडे, ता.शहादा येथील भानुराज तुकाराम पाटील हे आपल्या कारने (क्रमांक एमएच 39-2158) शहादाकडून सुलवाडेकडे जात होते. लोणखेडा चौफुलीजवळ दुचाकीवर जाणा:या महाविद्यालयीन विद्याथ्र्याना वाचविण्यात त्यांची कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या रोहित्राला धडकली. त्यात कारने दोनदा पलटली. रोहित्र सुरू होते, परंतु सुदैवाने कारमध्ये विद्युत प्रवाह न उतरल्याने पुढील अनर्थ टळला. अपघातात कारचे पुढील दोन्ही दरवाजे लॉक झाल्याने मागील दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढावे लागले. या अपघातात कारचालक भानुराज तुकाराम पाटील यांना किरकोळ खरचटले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल़े 
 

Web Title: The electric power of the car Rohilla is not well-intentioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.