जि़प़निवडणूकीचा आखाडा रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 11:32 IST2019-11-20T11:14:50+5:302019-11-20T11:32:32+5:30

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक होऊन महिना लोटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापन करण्याचा पेच सुरु ...

The electoral arena will paint | जि़प़निवडणूकीचा आखाडा रंगणार

जि़प़निवडणूकीचा आखाडा रंगणार

रमाकांत पाटील । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधानसभा निवडणूक होऊन महिना लोटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापन करण्याचा पेच सुरु असतानाच आता जिल्हा परिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्याने ग्रामीण भागात राजकारणाचा नवा ‘गेम’ सुरु झाला आह़े त्यामुळे या निवडणूकीसाठी नव्या आघाडय़ांचे डावपेच रंगू लागले आहेत़        
नंदुरबारसह धुळे, वाशिम, अकोला आणि नागपूर या पाच जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणा:या पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यकाळ वर्षभरापूर्वीच पूर्ण झाला होता़ त्यामुळे या निवडणूकीचे राजकारण जिल्ह्यात तापले असतानाच न्यायालयीन वादात त्या निवडणूका लांबल्या़ दरम्यान  सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणूका झाल्या़ त्यानंतर महिनाभरापूर्वी विधानसभा निवडणूका झाल्या़ या निवडणूकांबाबत स्थानिक राजकारण वेगवेगळ्या गटातटात विभागले गेल़े लोकसभा निवडणूकीच्यावेळी काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे जे नेते होत़े त्यातील काही नेत्यांनी विधानसभा निवडणूकीच्या काळात पक्ष अदलाबदल केल्याने जिल्ह्याचे राजकारणच सध्या बदलले आह़े 
जिल्हा परिषदेच्या राजकारणाच्या विचार करता त्यातील राजकारणाचा प्रवाहही पूर्णत: बदलल्यागत स्थिती आह़े प्रशासक येण्यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती़ तर दुस:या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी होता़ भाजपाला जेमतेम एक जागा होती़ आता बदलत्या राजकीय समीकरणात जिल्ह्यातील पक्षीय स्थिती पूर्णत: बदलली आह़े या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूका होत असल्याने त्याबाबत लोकांना प्रचंड उत्सुकता लागून आह़े अर्थात विधानसभेच्यावेळी जे राजकीय चित्र होत़े त्यातील काही गट-तट देखील या निवडणूकीच्यावेळी आपली स्वतंत्र भूमिका घेणार असल्याने निवडणूकीसाठी कसे राजकीय समीकरणे राहतील याबाबतही विविध तर्क वितर्क लावले जात आहेत़ 


जिल्हा परिषद गट व गणांची आरक्षण नवीन आरक्षण सोडत  काढण्यात आली होती़ नवीन लोकसंख्येनुसार एक गट वाढला आह़े त्यामुळे आता एकुण गटांची संख्या 56 झाली आह़े तर  सहा पंचायत समितींचे एकुण 112 गण झाले आहेत. धडगाव तालुक्यात एक गट कमी झाला असून शहादा व नवापूरात प्रत्येकी एक गट वाढला आहे. या 56 गटांमध्ये 28 गट हे महिलांसाठी राखीव झाले आहेत. दरम्यान, 44 गट अनुसुचित जमाती प्रवर्गासाठी, 11 गट इतर मागास प्रवर्गासाठी  तर एक गट अनु़जाती प्रवर्गासाठी राखीव आह़े 
 

Web Title: The electoral arena will paint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.