Vidhan Sabha 2019: ऐन परीक्षा काळात निवडणुका, शिक्षकांची होणार कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 13:04 IST2019-09-25T12:58:51+5:302019-09-25T13:04:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शाळा- महाविद्यालयांच्या परिक्षा काळातच विधान सभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शिक्षकांची कसरत होणार आहे. ऐन ...

Vidhan Sabha 2019: ऐन परीक्षा काळात निवडणुका, शिक्षकांची होणार कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शाळा- महाविद्यालयांच्या परिक्षा काळातच विधान सभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्याने शिक्षकांची कसरत होणार आहे. ऐन परिक्षा काळात निवडणुकीचेही कामकाज करावे लागण्याची शक्यता आहे.
शनिवारी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. पुढील महिन्यात 10 ऑक्टोबरपासून शाळांच्या व त्यानंतर महाविद्यालयांच्या सत्र परिक्षा सुरु होणार आहेत. शाळा, महाविद्यालयात सत्र परीक्षांची धामधुम सुरु असतांना या धामधुमीतच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने शिक्षकांना कसरत करावी लागणार आहे. आधिच प्रथमसत्र लहान असल्याने तसेच यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने शाळा, महाविद्यालयांनी सुटय़ा जास्त झाल्याने शाळांमधुन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना जादा तासिका घ्याव्या लागत आहेत. निवडणुकीच्या कामांचा अधिकचा बोजा शिक्षकांवर पडणार असल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहेच शिवाय परिक्षाकाळात निवडणुकीचे प्रशिक्षण शिबिरे होणार असल्याने परीक्षांमध्ये देखील व्यत्यय येण्याची शक्यता आहेच. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात व शिक्षकांनाही परिक्षांकडे पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे यासाठी शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून दूर ठेवण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.