43 ग्रा.पं.च्या 54 जागांसाठी पोटनिवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:19 IST2019-11-07T12:19:21+5:302019-11-07T12:19:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींमधील 54 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 16 नोव्हेंबरपासून अर्ज ...

43 ग्रा.पं.च्या 54 जागांसाठी पोटनिवडणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायतींमधील 54 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 16 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतीची मुदत येता चार महिन्यात संपणार नसल्यामुळे एकाही ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक राहणार नाही. असे असले तरी 43 ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या 54 रिक्त जागांसाठी मात्र पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर रोजी तहसीलदारांनी नोटीफिकेशन जाहीर केले आहे. त्यानुसार 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल अर्जाची छाननी 22 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर्पयत अर्ज माघारीची तारीख आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकाही मोठय़ा ग्रामपंचायतीच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक नाही.