निवडणुकीला तिसºयांदा स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:12 IST2020-09-10T11:12:13+5:302020-09-10T11:12:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगिती मिळालेल्या धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या मध्यावधी निवडणुकीला आता तिसऱ्यांदा बेमुदत स्थगिती मिळाली आहे. ...

निवडणुकीला तिसºयांदा स्थगिती
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगिती मिळालेल्या धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या मध्यावधी निवडणुकीला आता तिसऱ्यांदा बेमुदत स्थगिती मिळाली आहे. या निवडणुका आता कोरोना नियंत्रणानंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धुुळे-नंदुरबार विधानपरिषदेचे आमदार अमरिशभाई पटेल यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदार संघातील मध्यावधी निवडणूक जाहिर झाली होती. त्यासाठी भाजपतर्फे अमरिशभाई पटेल व काँग्रेसतर्फे अभिजीत पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीलाही त्यावेळी ६० दिवसांची स्थगिती दिली होती.
हा कालावधी मे च्या शेवटच्या आठवड्यात पुर्ण झाला होता. तथापी कोरोनाची परिस्थिती गंभीर होत गेल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढविण्यात आले. त्यामुळे त्यावेळी देखील दुसऱ्यांदा ४५ दिवसांची निडणुकीला स्थगिती दिली होती. तो कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतरही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने या निवडणुकीला आता बेमुदत स्थगिती देण्यात आली आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या निवडणुकीच्या कालावधी जानेवारी २०२२ पर्यंत आहे. त्यामुळे कुणीही उमेदवार विजयी झाल्यास त्यांचा कालावधी तोपर्यंत राहणार आहे. आधीच कमी कालावधीसाठी निवडणुका होत असल्याने राजकीय गोटात त्याबाबत एक वेगळी चर्चा होती.
या कमी कालावधीतही आता पुन्हा लॉकडाऊनमुळे सहा महिने स्थगितीतच गेले आहेत. अजून किती काळ स्थगिती राहील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या निवडणुकीला तिसºयांदा स्थगिती मिळाली असून त्यावर आता कालावधी दिलेला नाही. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आल्यानंतरच निवडणुकीची शक्यता आहे. बिहार विधान सभेच्या निवडणुकीसंदर्भात सरकार काय निर्णय घेते त्या निर्णयावरही या निवडणूक प्रक्रियेचा निर्णय अवलंबून राहणार आहे.
-अभिजीत पाटील, उमेदवार.
विधान परिषद निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगच निर्णय घेऊ शकतो. आणि बिहार विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने जर निर्णय घेतला तर मग विधानपरिषद निवडणूकही त्याबरोबर लागू शकते, असे वाटते. पण शेवटी याबाबत निवडणूक आयोगाच निर्णय घेईल.
-अमरिशभाई पटेल, उमेदवार.