नंदुरबार जिल्हा वकील संघाची निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 12:41 IST2019-05-02T12:41:02+5:302019-05-02T12:41:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा वकील संघाच्या निवडणूकीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली़ सभेत वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी कमलाकर ...

Election of Nandurbar District Advocate Association unanimously | नंदुरबार जिल्हा वकील संघाची निवडणूक बिनविरोध

नंदुरबार जिल्हा वकील संघाची निवडणूक बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा वकील संघाच्या निवडणूकीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली़ सभेत वकील संघाच्या जिल्हाध्यक्षपदी कमलाकर एच़सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ 
उपाध्यक्षपदी मोहम्मद नबा पठाण, सचिवपदी समीर कुलकर्णी यांची तर सहसचिवपदी शारदा बी़पवार यांची निवड जाहीर करण्यात आली़ सभेत प्रारंभी सचिव समीर कुळकर्णी यांनी सभेचे इतिवृत्त वाचून दाखवल़े यानंतर 2019-20 या वर्षासाठी नूतन अध्यक्ष व कार्यकारिणी निवड करण्यासंबधी चर्चा करण्यात आली़ निवडणूक अधिकारी म्हणून अॅड़ प्रशांत चौधरी यांची निवड झाली़ यानंतर संघाच्या सदस्यांमधून अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्यांसाठी नामांकन मागवण्यात आल़े अध्यक्षपदासाठी कमलाकर सावळे, उपाध्यक्ष मोहम्मद पठाण व सचिव कुलकर्णी, सहसचिव पवार यांची बिनविरोध निवड झाली़ 

Web Title: Election of Nandurbar District Advocate Association unanimously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.