Election Commissioners take a review at Shahada | निवडणूक उपायुक्तांनी घेतला शहादा येथे आढावा
निवडणूक उपायुक्तांनी घेतला शहादा येथे आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणूक उपायुक्त डॉ.अजरुन चिखले यांनी शहादा तहसील कार्यालयाला भेट देऊन दिव्यांग मतदारांना देण्यात येणा:या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.केतन गिरासे यांनी डॉ. अजरुन चिखले यांना माहिती दिली.  चिखले यांनी दिव्यांग मतदारांना देण्यात येणा:या सुविधांचा तसेच मतदार जनजागृती मोहीमेबाबत आढावा घेतला. याबाबत त्यांनी गटशिक्षण अधिका:यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन तिथे आश्वासित किमान सुविधांची पाहणी केली. 
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शहादा डॉ.चेतन गिरासे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी हे उपस्थित होते.    


Web Title: Election Commissioners take a review at Shahada
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.