‘बाल संसद’द्वारे शाळेचा मुख्यमंत्री निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:47 IST2019-07-28T12:46:59+5:302019-07-28T12:47:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : शालेय विद्याथ्र्याना लोकशाही पद्धत समजून घेण्याच्या उद्देशाने तालुक्यातील कालीखेतपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ...

‘बाल संसद’द्वारे शाळेचा मुख्यमंत्री निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : शालेय विद्याथ्र्याना लोकशाही पद्धत समजून घेण्याच्या उद्देशाने तालुक्यातील कालीखेतपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘बाल संसद’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शालेय स्तरावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया घेण्याविषयी चर्चा करण्यात आली.
या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग अूसन 139 पटसंख्या आहे. या विद्याथ्र्याना लोकशाही पद्धतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निवडण्याच्या प्रक्रियेअंतर्गत समित्यांची रचना करण्यात आली. त्यात प्रामुख्याने मुख्य निवडणूक समिती, आचारसंहिता समिती, चिन्ह वाटप समिती व इतर समित्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्यास सुरुवात झाली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. तारखेनिहाय कामाचे नियोजन करण्यात आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून मुख्याध्यापक रुपेशकुमार नागलगावे, आचारसंहिता समिती प्रमुख दशरथ पावरा, चिन्ह वाटप समिती प्रमुख लक्ष्मीपुत्र उपीन व मतदार यादी तयार करणे व यादी घोषित करण्याचे काम तेगा पावरा यांनी पाहिले.
या बाल संसद निवडणुकीस झोनल अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी जयंत चौरे, तालुका अधिकारी म्हणून गटशिक्षणाधिकारी अनिल दोडे, राजपूत, योगेश सावळे, शिलवंत वाकोडे, मतमोजणी अधिकारी म्हणून रमेश चौधरी व सागर धनेधर यांनी काम पाहिले. प्रत्यक्ष निवडणूक पार पडली असता सातवीच्या वर्गातील विद्यार्थी नाण्या रमेश पावरा याला 4 मते, मोज्या लोह:या पावरा याला 33 मते, मनीषा अंधा:या पावरा हिला 50 मते, मोगी रमेश पावरा हिला 51 मते मिळाली. एकूण 139 पैकी 138 मते वैध होती. रमेश चौधरी यांनी निवडणुकीचा निकाल घोषित केला. मोगी रमेश पावरा हिने एका मताने विजय मिळवत मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळवला. मुख्यमंत्री निवडीनंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली 18 सदस्यीय शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली व पहिल्याच बैठकीत कामाची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडणे, शालेय विकासात भर टाकणे, गुणवत्तावाढीसाठी मुख्यमंत्री गटाकडून कार्य करण्याविषयी चर्चा करण्यात आली. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक रुपेशकुमार नागलगावे, शिक्षक लक्ष्मीपुत्र उपीन, दशरथ पावरा तेगा पावरा यांनी परिश्रम घेतले.