शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
3
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
4
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
5
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
6
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
7
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
8
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
9
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
11
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
12
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
13
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
14
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
15
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
16
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
17
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
18
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
19
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
20
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात सहा ग्रा.पं बिनविरोध तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीत निवडणूक ; ४४९ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात माघारीच्या अंतिम मुदतीत वैध ठरलेल्या ६४८ पैकी १९९ अर्ज ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात माघारीच्या अंतिम मुदतीत वैध ठरलेल्या ६४८ पैकी १९९ अर्ज मागे घेतले गेले. यातून ४४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १९९ अर्ज माघारीसोबत सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी तहसील कार्यालयात माघारीच्या अंतिम मुदतीत तालुक्यातील दोंदवाडे, नांदरखेडा, वर्ढेतर्फे शहादा, बामखेडातर्फे सारंगखेडा, हिंगणी व न्यू असलोद या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.             तालुक्यातील कुकावल ग्रामपंचायतीत १० जणांनी माघार घेतल्याने १८, कोठलीतर्फे सारंगखेडा ग्रामपंचायतीसाठी १५ अर्ज बाद झाल्याने १९, कुऱ्हावद तर्फे सारंगखेडा येथे ५ जणांनी माघार घेतल्याने १२, कवठळतर्फे सारंगखेडा येथे ६ अर्ज मागे घेतले गेल्याने ९, तोरखेडा येथे ९ जणांनी अर्ज मागे घेतल्याने २४ जण उमेदवारी रिंगणात आहेत. शेल्टी येथे १४ जणांनी माघार घेतल्याने १६, टेेंभे तर्फे सारंगखेडा येथील ९ जणांनी माघार घेतल्याने १५, बामखेडातर्फे तऱ्हाडी येथे ६ जणांनी माघार घेतल्याने २२, फेस येथे ४ जणांनी माघार घेतल्याने १५, पुसनद येथे १२ जणांनी माघार घेतल्याने १९, सोनवदतर्फे शहादा येथे ४ जणांनी माघार घेतल्याने १९ उमेदवार रिंगणात आहेत. कानडीतर्फे शहादा ग्रामपंचायतीसाठी  ११ अर्ज दाखल केले होते,  एकानेही माघार न घेतल्याने सर्व ११ उमेदवार रिंगणात आहेत. मनरद ग्रामपंचायतीसाठी दाखल १८ अर्जांपैकी एकाने माघार घेतल्याने १७ उमेदवार, डामरखेडा ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जांपैकी ६ अर्ज माघारी घेतल्याने २२, कोटबांधणी ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जांपैकी ५ अर्ज माघारी घेतल्याने १७, राणीपूर ग्रामपंचायतीच्या दाखल अर्जांपैकी २ अर्ज माघारी घेतल्याने ३१, नागझिरी ग्रामपंचायतीत आठ अर्ज माघारी घेतल्याने १२ तर असलोद ग्रामपंचायतीसाठी दाखल ४४ अर्जांपैकी १४  अर्ज माघारी घेतल्याने ३० उमेदवार रिंगणात आहेत. 

सारंगखेडा येथे ३६ उमेदवार रिंगणात    जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या तालुक्यातील सारंगखेडा ग्रामपंचायतीच्या सहा प्रभागांमधील १७ सदस्यपदाच्या जागांसाठी दाखल अर्जांपैकी ७२ अर्ज वैध ठरले होते. यातील ३६ अर्ज माघारी घेतले गेल्याने ३६ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी निवडणुकीची रंगत उत्तरोत्तर वाढत असून, ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात जाणार याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तालुक्यातील दुसरी चर्चित ग्रामपंचायत म्हणून मोहिदेतर्फे शहादा ग्रामपंचायतीचा उल्लेख होत होता. या ग्रामपंचायतीसाठी दाखल अर्जांपैकी ४१ अर्ज वैध ठरले होते. दरम्यान, सोमवारी १० जणांनी माघार घेतल्याने ३१ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही मातब्बर उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक सर्वच प्रकारे चुरशीची ठरणार आहे.