एकनाथराव खडसेंचा राजीनामा घेतला, मग उर्वरित आठ मंत्र्यांना वेगळा न्याय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 09:29 PM2018-02-18T21:29:17+5:302018-02-18T21:29:25+5:30

हल्लाबोल : शहादा येथे सुप्रिया सुळेंचा सवाल

Eknathra Rao resigned, why did the remaining eight ministers have a different judge? | एकनाथराव खडसेंचा राजीनामा घेतला, मग उर्वरित आठ मंत्र्यांना वेगळा न्याय का?

एकनाथराव खडसेंचा राजीनामा घेतला, मग उर्वरित आठ मंत्र्यांना वेगळा न्याय का?

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पारदर्शक सरकारचा आव आणणा:या मुख्यमंत्र्यांनी सरकारमध्ये मंत्री असलेले वरिष्ठ सहकारी एकनाथराव खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तात्काळ राजीनामा घेत घरचा रस्ता दाखवला़ मग भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आठ मंत्र्यांना पाठिशी घालण्याचे कारण काय, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी शहादा येथे उपस्थित केला़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय हल्लाबोल आंदोलनांतर्गत शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत खासदार सुळे बोलत होत्या़ यावेळी मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला सेलच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जयदेव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हा प्रभारी उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, माजी आमदार शरद गावीत, युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होत़े शहादा पालिका परिसरातील जनता चौकात आयोजित करण्यात आलेल्या सभेपूर्वी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती़ या रॅलीत शेकडो युवक सहभागी झाले होत़े
पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माजी महसूल मंत्री यांच्या प्रयत्नांनी राज्यात भाजपाचे सरकार आले होत़े त्यांनी जीवाचं रान करून पक्षाला न्याय दिला परंतू फडणवीस सरकारने त्यांच्या अन्याय केला आह़े हाच काय मुख्यमंत्री फडणवीस यांचा पारदर्शक कारभार, राष्ट्रवादीचे सव्रेसर्वा शरद पवार यांच्यावर असंख्य आरोप झाल़े परंतू त्यांना त्यांनी कधीच उत्तर दिले नाही़ ते काम करत राहिल़े जनतेने त्यांच्यावर केलेल्या प्रेमाची परतफेड म्हणून ते जनतेच्या समस्या समजून घेत आहेत़ हल्लाबोल आंदोलन हे राज्यात अडचणीत आलेले शेतकरी आणि मजूरांसाठी आह़े आज महाराष्ट्र आणि बेरोजगारी आणि महागाईच्या खाईत असताना मॅगअ‍ेटिक महाराष्ट्र नावाचा फसवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आह़े यातून जनतेची फसवणूक सुरू आह़े कोटय़ावधी रूपये अशा कार्यक्रमांवर खर्च करण्यापेक्षा थेट बेरोजगारांना रोजगार देण्यात सरकारला काय, होतय हेच कळत नाही़
सभेत प्रदेशाध्यक्ष तटकरे, चित्रा वाघ यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत सरकारवर घणाघाती टिका केली़

Web Title: Eknathra Rao resigned, why did the remaining eight ministers have a different judge?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.