ंअलखेड येथील मुलीला सिनेस्टाईल पळविण्याचा प्रय}

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:05 PM2018-08-17T12:05:32+5:302018-08-17T12:05:50+5:30

Ekalchade's daughter tried to flee to filmstation} | ंअलखेड येथील मुलीला सिनेस्टाईल पळविण्याचा प्रय}

ंअलखेड येथील मुलीला सिनेस्टाईल पळविण्याचा प्रय}

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीस एस.टी.बसमधून सिनेस्टाईल पळवून नेण्याचा प्रय} करणा:या कुढावद, ता.शहादा येथील युवकाविरुद्ध शहादा पोलीस   ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुरज दगा निकुंम या युवकाचे गावातील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. ही मुलगी शिक्षणासाठी दररोज एस.टी.बसने शहादा येथे जाते. 14 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे पिढीत मुलगी बसने शहादा येथून कुढावद गावाला जात होती. त्यावेळी सुरज निकुंम याने आपल्या चारचाकी वाहनाने येवून अलखेड ते तिखोरा गावा दरम्यान बसच्या पुढे चारचाकी वाहन उभे करून बस थांबविली. 
त्यानंतर बसमध्ये चढून त्याने मुलीशी असभ्य वर्तन केले. तिचा हात धरून तिला खाली उतरवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीचा विरोध आणि बसमधील इतर प्रवाशांनी केलेला विरोध पहाता युवकाने तेथून पलायन केले.
मुलीने घरी जावून याबाबत पालकांना माहिती दिली. त्यानंतर मुलीसह पालक शहादा पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे फिर्याद देण्यात आली. मुलीच्या फिर्यादीवरून सुरज दगा निकुंम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक पी.पी.थोरात करीत आहे. 
या प्रकारामुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे. संशयीत व त्याने वारपलेल्या कारचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Ekalchade's daughter tried to flee to filmstation}

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.