मद्यासह आठ लाखांचा मुद्देमाल शहाद्यात जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:29 IST2019-07-29T12:29:15+5:302019-07-29T12:29:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गुजरात कडे विनापरवाना अवैध रित्या मद्य वाहतूक करणा:या दोघांना शहादा पोलिसांनी अटक केली. या ...

मद्यासह आठ लाखांचा मुद्देमाल शहाद्यात जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गुजरात कडे विनापरवाना अवैध रित्या मद्य वाहतूक करणा:या दोघांना शहादा पोलिसांनी अटक केली. या कारवाईत एक लाख नऊ हजार 800 रुपयांचा मद्यसाठा व सात लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण आठ लाख नऊ हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी विकास पांडे व रमेश सिंह रावत या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांना मिळालेल्या माहितीनुसार खेतिया येथून गुजरातकडे विनापरवाना दारूची वाहतूक करणारे वाहन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, उपनिरीक्षक फुलपगारे पोलीस कॉन्स्टेबल दीपक भोई यांनी शहरातील जुना प्रकाशा रोड वरील सूर्या फॅक्टरी येथे सापळा लावला. त्या वेळी रात्री आठ वाजेच्या सुमारास जीजे 27 एच 7993 क्रमांकाचे वाहन येतांना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवले असता चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात 74 हजार 880 रुपये किमतीची मास्टर ब्लेंड, तेवीस हजार पाचशे वीस रुपये किमतीची डीएसपी ब्लॅक व 11 हजार 400 रुपये किमतीचे हावर्ड कंपनीची बियर असा एकूण एक लाख नऊ हजार आठशे रुपये किमतीचा देशी-विदेशी मदय साठा आढळून आला.
पोलिसांनी मद्यसाठासह सात लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले. याप्रकरणी विकास सुधीर भाई पांडे (22) व रमेश सिंह किसन सिंह रावत (25) दोघे राहणार अंकलेश्वर या दोघांना ताब्यात घेतले. हवालदार दिपक भोई यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली. तपास उपनिरीक्षक राजेश पाटील करत आहेत.