मिरचीची दशा संपावी म्हणून ‘अंडी व ताक’ मात्रेची ‘दिशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:42 IST2020-10-12T12:42:35+5:302020-10-12T12:42:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : नंदुरबार तालुक्यात यंदा मिरचीवर पुन्हा घुबडा रोगाने आक्रमण केले आहे. या रोगावर नियंत्रण ...

मिरचीची दशा संपावी म्हणून ‘अंडी व ताक’ मात्रेची ‘दिशा’
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यात यंदा मिरचीवर पुन्हा घुबडा रोगाने आक्रमण केले आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक प्रयोग थांबवत घरगुती ईलाजांना प्राधान्य दिले आहे. यातून तालुक्यात बºयाच ठिकाणी मिरचीवर गोमूत्र, अंडी आणि ताकाच्या मिश्रणाची फवारणी सुरू झाली असून यामुळे दशा झालेल्या मिरची पिकाला दिशा मिळण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत.
नंदुरबार तालुक्यात यंदाही सुमारे १ हजार ६०० हेक्टर मिरची लागवड झाली आहे. यंदा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसाचा फटका मिरची पिकाला बसला असून यातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मिरची पाण्यात सापडून नुकसान झाले आहे. ज्या शेतकºयांची मिरची झाडे उभी आहेत. त्यांना मिरचीवर चुरडा-मुरडा अर्थात घुबडाचा आजार दिसून येत आहे. यातून पाने चुरगळली जावून फळधारणा होणाºया झाडाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावून झाडे फळधारणेविनाच रहात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी नुकसान टाळण्यासाठी मिरची झाडांवर रासायनिक औषधांची फवारणी केली होती. परंतु त्यात यश मिळालेले नव्हते. यातून शेतकºयांनी यापूर्वी अमंलात आणलेला देशी दारू फवारणीचा इलाज करण्यास सुरूवात केली होती. यापासून पुढे जात तालुक्यातील तज्ञ शेतकºयांनी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवत उकडलेल्या अंड्याचा चुरा आणि ताकाचे मिश्रण करुन मिरची झाडांवर फवारणीला सुरूवात केली आहे. तिघा घरगुती उपायांच्या माºयामुळे मिरचीची झाडे पूर्ववत होत असल्याचा शेतकºयांचा दावा असून या उपायामुळे मिरची हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
- नंदुरबार तालुक्यातील लहान शहाद्यासह शिंदे, कोळदे, पळाशी या परिसरातील तसेच लगतच्या गुजरात राज्यातील पिंपळोद, वेलदा, निझर, यावल, वाका चाररस्ता या गावांमधील शेतकरी या उपायांची अंमलबजावणी करत आहेत. साधारण २५ पंपांसाठी ३५ अंडी उकडून ती रात्रभर पाण्यात भिजवून ठेवत घरी तयार केलेल्या ताकात एकत्र करुन ते मिश्रण पिकांवर फवारले जात आहे. दरम्यान गुजरात राज्यातील काही शेतकरी देशी दारूचाही मुबलक प्रमाणात वापर करत आहेत. तालुक्यात गेल्या काही दिवसात शेतकरी चुरडा-मुरडाच्या आक्रमणाने शेतातील मिरची झाडे उपटून फेकत असल्याचेही दिसून आले आहे.
- दरम्यान पाचोराबारी ता. नंदुरबार येथील शेतकºयाने पाच तर गुजरातमधील मुबारकपूर येथील एका शेतकºयाने चुरडा-मुरडामुळे खराब झालेल्या सहा एकर मिरची पिकावर नांगर फिरवला होता.
- चुरडामुरडामुळे पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले होते. यातून शेतकरी हैराण झाले होते. रासायनिक औषधींची मात्रा कामी येत नसल्याने शेतकºयांनी पारंपरिक उपाययांकडे लक्ष दिले आहे. अंडी, ताक यांचा वापर यापूर्वीही शेतकरी करत आले आहेत. शेतीक्षेत्रात प्रामुख्याने स्लरी हा प्रकार रूढ आणि प्रभावी आहे. अनेक शेतकरी त्याचा वापर करतात.
- -वसंत हिरामण पाटील, शेतकरी, बामडोद ता. नंदुरबार.