गुणवत्तावाढीसाठी शेवटच्या घटकापर्यंत प्रयत्न व्हावेत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:28 IST2021-07-26T04:28:21+5:302021-07-26T04:28:21+5:30

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता ...

Efforts should be made till the last drop for quality improvement, said Chief Executive Officer Raghunath Gawde | गुणवत्तावाढीसाठी शेवटच्या घटकापर्यंत प्रयत्न व्हावेत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे प्रतिपादन

गुणवत्तावाढीसाठी शेवटच्या घटकापर्यंत प्रयत्न व्हावेत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांचे प्रतिपादन

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नावीन्यपूर्ण उपक्रम कक्षाच्या आढावा सभेत ते बोलत होते.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन व नावीन्यपूर्ण उपक्रम कक्ष स्थापना करण्यात आला आहे. या कक्षाची आढावा बैठक जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे होते. यावेळी प्राचार्य डॉ. जगराम भटकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, सदस्य सचिव वरीष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, जीवन मोराणकर, प्राचार्य डॉ. संजय शिंदे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सर्व अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी, पालिका प्रशासन अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी, कक्षाचे शिक्षण विस्तार अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील विषय सहाय्यक, केंद्रप्रमुख संघाचे प्रतिनिधी, मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी तसेच शिक्षक संघटना प्रतिनिधी, उपक्रमशील शिक्षक प्रतिनिधी, समग्र शिक्षा अभियानातील कार्यक्रम अधिकारी तसेच ज्ञानप्रकाश फाउंडेशन, पिरॅमल फाउंडेशन व प्रथम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

आढावा बैठकीत प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांनी कक्ष स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट करत कक्षाच्या ध्येय धोरणांची माहिती दिली.

प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. चौधरी यांनी जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी सर्व अधिकारी व शिक्षकांनी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम यांनी माध्यमिक शाळांसाठी नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाची माहिती दिली.

धडगावचे गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, नवापूरचे आर. बी. चौरे, अक्कलकुव्याचे आर. आर. देसले, तळोद्याचे शेखर धनगर, नंदुरबारचे विस्तार अधिकारी सचिन गोसावी व शहाद्याचे बी. जी. वळवी यांनी ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.

नगरपालिका प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे यांनी नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाबाबतच्या उपक्रमांची माहिती दिली. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांची माहिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे यांनी दिली.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार यांनी संस्थेमार्फत सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

कार्यक्रमात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता भालचंद्र पाटील, डॉ.संदीप मुळे, पंढरीनाथ जाधव व सर्व विषय सहाय्यक सहभागी होते. सूत्रसंचालन व आभार वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांनी केले.

Web Title: Efforts should be made till the last drop for quality improvement, said Chief Executive Officer Raghunath Gawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.