अर्धवट कामांमुळे वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:32 IST2020-02-03T12:32:36+5:302020-02-03T12:32:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बहुतांश कामे अर्धवट राहिले आहे. त्यामुळे आंतरराज्य वाहतुक ठप्प होऊन ...

Effect of traffic on partial works | अर्धवट कामांमुळे वाहतुकीवर परिणाम

अर्धवट कामांमुळे वाहतुकीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बहुतांश कामे अर्धवट राहिले आहे. त्यामुळे आंतरराज्य वाहतुक ठप्प होऊन वाहन नियोति ठिकाणी अपेक्षित वेळेवर पोहोचत नाही. तर हिच अर्धवट कामे अपघातांनाही कारणीभूत ठरत आहे. हे अपघात टाळण्यासाठी रखडलेल्या कामांना गती देण्याची मागणी होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या मार्गाची व्याप्ती वाढवत आंतरराज्य वाहतुकीत सुरक्षितता व आरण्यासाठी २०१० व २०१३ पर्यंत सर्व्हे करण्यात आले. सर्व्हेनुसार शासनामार्फत आवश्यक तो निधीही मंजूर करण्यात आला. त्यातून मार्ग चौपरीकरणाचे काम काही वर्षांपूर्वीच हाती घेण्यात आले. परंतु चौपदरीकरण कामातील अनेक पूल व ठिकठिकाणी रस्त्याचे देखील कामे रखडली आहे.
या मार्गावरील मंजूर कामे ठराविक अंतरानुसार वेगवेगळ्या मक्तेदारांना काम देण्यात आले होते. त्यात नवापूर तालुक्यातील बेडकी ते धुळेपर्यंतच्या रस्ता विकास कामांसाठी एका ठेकेदाराला काम देण्यात आले होते. परंतु त्याला काही कारणास्तव हे काम पेलवता आले नाही. रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी पुन्हा हेच काम दुसºया ठेकेदाराला देण्यात आले. परंतु दुसºया ठेकेदारानेही या कामात उदासिनता दाखवल्याने कामे रखडली. त्यामुळे या मार्गावरुन होणाºया आंतरराज्य वाहतुकीवर परिणाम होत आहे. या वाहतुकीत सुरक्षितता आणत सुरळीतताही आणण्यासाठी ही कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. म्हणून कामांना गती देण्याची मागणी आंतरराज्य वाहतुकदारांसह स्थानिक नागरिकांमधूनही होत आहे.

पश्चिम रेल्वेच्या चिंचपाडा येथील रेल्वे गेटची उंचीमहामार्गवरुन होणाºया अवजड वाहतुकीसाठी अनुकूल तयार करण्यात आला नसल्याचे अनेक ट्रकचालकांसह अवजड वाहतुक करणाºया चालकांमार्फत सांगण्यात येत आहे. अपेक्षेनुसार उंची ठेवण्यात आली नसल्यामुळे या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांमार्फत योग्य उपाययोजना करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

महामार्ग व रेल्वे हे दोन्ही विषय केंद्र शासनांतर्गत येत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या कामाला गती देण्यासाठी अपेक्षेनुसार तरतुद होणे अपेक्षित होते. परंतु केवळ यासाठी कुठलीही स्वतंत्र भूमिका घेण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे.
४रखडलेल्या कामांमध्ये नवापूर तालुक्यातील रायंगण, विसरवाडी, नवापूर येथील पुलांसह ठिकठिकाणी चौपदरीकरणचे काम देखील रखडले आहे. या कामांना गती देण्याची मागणी होत आहे.

 

Web Title: Effect of traffic on partial works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.