शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम ' भारत सेवा गोल्ड मेडल अवॉर्ड' ने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:36 IST2021-08-18T04:36:52+5:302021-08-18T04:36:52+5:30

यावेळी समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ,उपमुख्य कार्यकारी ...

Education Officer Machhindra Kadam honored with 'Bharat Seva Gold Medal Award' | शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम ' भारत सेवा गोल्ड मेडल अवॉर्ड' ने सन्मानित

शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम ' भारत सेवा गोल्ड मेडल अवॉर्ड' ने सन्मानित

यावेळी समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, समाज कल्याण अधिकारी राकेश महाजन,डी.जी.नांदगावकर, पशुवैद्यकीय अधिकारी सतीश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन बोडके आदींसह अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. नंदुरबारचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी कोरोनाकाळात राबवलेले उपक्रम शिक्षण क्षेत्रात आदर्श ठरले आहेत, लसीकरणसाठी स्कूल बस, शिक्षकांचे जाणीव जागृती उपक्रम, कोरोना ड्युटी,जिल्हा कोविड नियंत्रण कक्ष, आकांक्षित जिल्हा योजनेत नंदुरबार दुसऱ्या क्रमांकावर आणणे, तंबाखूमुक्त शाळा, वृक्षारोपण, मतदार जागृती यात मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कदम यांनी गुणवत्ता वाढीसाठी राबविलेली 'शिक्षण पंचसूत्री'मुळे विद्यार्थी, पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या कार्याची दखल महात्मा गांधी ग्लोबल पीस फाऊंडेशन युनिव्हर्सिटीचे ब्रँड ॲम्बेसिडर मणिलाल शिंपी यांनी घेत हा पुरस्कार देण्यात आला. चेन्नई येथील फेस्टिव्हलमध्ये निमंत्रित करून सन्मानचिन्ह देऊन कदम यांचा गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार मिळाल्याने शिक्षण क्षेत्रातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Education Officer Machhindra Kadam honored with 'Bharat Seva Gold Medal Award'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.