होराफळी येथे वालंबा केंद्रांतर्गत शिक्षण परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:05 IST2021-09-02T05:05:38+5:302021-09-02T05:05:38+5:30
या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी आर.आर. देसले, केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी, भावेश मोरे, मुख्याध्यापक सुनील मावची, वासू पाडवी प्रमुख अतिथी म्हणून ...

होराफळी येथे वालंबा केंद्रांतर्गत शिक्षण परिषद
या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी आर.आर. देसले, केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी, भावेश मोरे, मुख्याध्यापक सुनील मावची, वासू पाडवी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिक्षण परिषदेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार (डाएट) यांच्यामार्फत नियोजित तासिका घेण्यात आल्या. या तासिकेविषयक चर्चा व मार्गदर्शन केंद्रप्रमुख कांतीलाल पाडवी यांनी केले. तासिका ऑनलाइन माध्यमातून वर्ग कसा आयोजित करावा. डाएटमार्फत पुरविण्यात आलेल्या संदर्भाच्या साहाय्याने माहिती व चर्चा घडवून दिनेश पाडवी व रायसिंग वळवी यांनी पार पाडली तासिका-३ सेतू अभ्यासक्रम एकत्रित अहवाल सादरीकरण
या तासिकेविषयक आढावा व चर्चेची जबाबदारी देवीसिंग वसावे यांनी पार पाडली. तासिका-४ राज्यस्तरीय उपक्रम व स्वाध्याय उपक्रम आढावा या तासिकेविषयक माहिती व आढावा कांतीलाल पवार यांनी सादर केली तासिका जीवन शिक्षण अंकाचा परिचय तासिकेची माहिती देण्याची जबाबदारी किशोर गवळी यांनी तासिका-६शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची अंमलबजावणी, डाएटमार्फत पुरविण्यात आलेल्या संदर्भाच्या साहाय्याने माहिती सादरीकरण हेमकात तिरमले यांनी केले. शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठनविषयक माहिती भावेश मोरे यांनी दिली. सूत्रसंचालन सुरूपसिंग वसावे यांनी तर आभार दीपक वसावे यांनी मानले.