महिलेचा विश्वास संपादन करीत ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 11:49 IST2019-05-30T11:48:57+5:302019-05-30T11:49:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनोळखी व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील 16 हजार रुपयांचे दागीने लंपास केल्याच घटना ...

Editing the trust of a woman, | महिलेचा विश्वास संपादन करीत ऐवज लंपास

महिलेचा विश्वास संपादन करीत ऐवज लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अनोळखी व्यक्तीने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील 16 हजार रुपयांचे दागीने लंपास केल्याच घटना  28 रोजी नंदुरबारातील तहसील कार्यालय परिसरात घडली. 
नवापूर येथील इस्लामपूरा भागातील रुखसानाबी हुसेन शहा  या कामानिमित्त 28 रोजी नंदुरबारात  आल्या होत्या. तहसील कार्याल परिसरात त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला त्याने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील पर्स लांबविली. पर्समध्ये 14 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने व दोन हजार रुपये रोख होते. महिलेच्या लक्षात ही बाब आल्यावर तोर्पयत संबधीत व्यक्ती पसार झाला होता. महिलेने रात्री उशीरा पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून उपनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पाटील करीत आहे. 
 

Web Title: Editing the trust of a woman,