जिल्ह्यातील तीन लाख कुटूंबांची आर्थिक गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:33 IST2019-11-27T11:33:16+5:302019-11-27T11:33:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र शासनाच्या सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमांर्गत जिल्ह्यातील सुमारे तीन लाख कुटूंबांचे आर्थिक सव्रेक्षण ...

Economic calculation of three lakh families in the district | जिल्ह्यातील तीन लाख कुटूंबांची आर्थिक गणना

जिल्ह्यातील तीन लाख कुटूंबांची आर्थिक गणना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्र शासनाच्या सातव्या आर्थिक गणनेच्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमांर्गत जिल्ह्यातील सुमारे तीन लाख कुटूंबांचे आर्थिक सव्रेक्षण होणार आह़े 27 नोव्हेंबरपासून सुरु होणा:या या उपक्रमासाठी दीड हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक जिल्हा प्रशासनाने नियुक्त केले आहेत़ 
या सातव्या आर्थिक गणना कार्यक्रमाबाबत जिल्हा प्रशासनाने पत्रकार परिषद घेत माहिती दिली़ अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी माहिती दिली़ या गणनेसाठी कॉमन सर्विस सेंटर्सची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्त करण्यात आलेले प्रगणक आणि पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पूर्ण करुन आर्थिक सव्रेक्षणाला प्रारंभ करण्यात आला आह़े पत्रकार परिषदेत माहिती देताना अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी आर्थिक गणनेची व्याप्ती, नोंदणीचा तपशील आणि नंदुरबार जिल्ह्यातील गणनेची माहिती दिली़ सहा तालुक्यात तीन महिन्याच्या या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध 13 प्रशासकीय अधिका:यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आल़े 
या आर्थिक गणनेंतर्गत सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची माहिती प्रत्यक्ष घरोघरी जावून संकलित करण्यात येणार आह़े घरी चालवले जाणारे कुटीरोद्योग, गृहउद्योग, छोटे मोठे व्यवसाय, फेरीवाले, भाजीपाला व्यावसायिक, दुग्धोत्पादक यासह विविध प्रकारे अर्थाजन करुन कुटूंबांचे पालनपोषण करणा:यांची माहिती या आर्थिक गणनेतून समोर येणार आह़े ऑनलाईन पद्धतीने होणा:या या गणनेमुळे जिल्ह्यातील उद्योग धंद्यांची स्थिती समजून येण्यास मदत मिळणार असून ग्रामीण भागात सुरु असलेल्या छोटय़ा उद्योगांची माहिती मिळणार आह़े धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील गावांमध्ये होणा:या या सव्रेक्षणासाठी प्रगणक ऑफलाईन पद्धतीने कामकाज करुन त्याची दोन दिवसाच्या आत ऑनलाईन नोंदणी होणार आह़े जिल्ह्यात सहाव्या आर्थिक गणनेंतर्गत 46 हजार मोठे, लघु उद्योग, व्यवसाय, कुटीरोद्योग, गृहउद्योग असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आह़े 

गणनेत दुकाने आणि आस्थापना अधिनियम 1953, कंपनी अधिनियम 2013, लिमिटेड लायबिलीटी पार्टनरशिप अॅक्ट 2008, भारतीय विश्वस्त संस्था अधिनियम 1882, संस्था अधिनियम नोंदणी 1860, सहाकारी संस्था अधिनियम 1912, परकीय कंपनी आणि नोंदणी नसलेल्या आस्थापना, किरकोळ विक्रेते, फेरीवाले यासह गृहउद्योग यांची पडताळणी करुन मोबाईल अॅपद्वारे माहिती घेतली जाणार आहे 
सार्वजनिक सेवेत कार्यरत शासकीय कार्यालये, कृषी पिके लागवड व निर्मिती, संरक्षण आस्थापना, अर्धसैनिकी व सैनिकी संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था, फक्त वेतनावर/मजुरीवर अवलंबून कुटूंब, विदेशातील कुटूंब, तरंगती लोकसंख्या, उघडय़ावर, रस्त्याच्या बाजूला, पुलाखाली पाय:यांवर, पाईपात, रेल्वे प्लॅटफार्मवर राहणारी कुटूंबे, कैदी, रुग्ण, निवारा नसलेले भटके कुटूंब, बेकायदेशीर जुगार, वेश्या व्यवसाय, भिक मागण्यासंबधीचे व्यवसाय नोकर-चाकर, सुतार, गवंडी, कोणत्याच आर्थिक कार्यात न गुंतलेले लोक यांचा या गणनेत समावेश होणार नाही़ 
गणनेसाठी अक्कलकुवा तालुक्यात 56 पर्यवेक्षक 146 प्रगणक, धडगाव 29 पर्यवेक्षक 125 प्रगणक, नंदुरबार 81 पर्यवेक्षक  171 प्रगणक, नवापुर 71 पर्यवेक्षक 160 प्रगणक, शहादा 99 पर्यवेक्षक 292 प्रगणक तर तळोदा तालुक्यासाठी 43 पर्यवेक्षक आणि 89 प्रगणकांची नियुक्ती असून ते बुधवारपासून गणनेसाठी रवाना होणार आहेत़ 

नंदुरबार जिल्ह्यात 2011 च्या जनगणेनुसार 50 हजार 738 शहरी तर 2 लाख 72 हजार 783 ग्रामीण कुटूंब आहेत़ एकूण 3 लाख 23 हजार 521 कुटूंबांच्या सव्रेक्षणासाठी बुधवारपासून 662 प्रगणक व 692 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत़ हे नियुक्त कर्मचारी सर्व सहा तालुक्यातील गावांमध्ये दरदिवशी भेटी देणार असून तीन महिन्यांर्पयत त्यांच्याकडून माहितीचे संकलन केले जाणार आह़े संकलित केलेल्या माहिती नुसार जिल्ह्यात येत्या काळात निधी उपलब्धता व विकासात्मक कामकाजाचे नियोजन करण्यात येणार आह़े 
 

Web Title: Economic calculation of three lakh families in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.