नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात पंचनाम्यांचा तिढा अजूनही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:45 IST2019-11-08T12:45:26+5:302019-11-08T12:45:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि ...

नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात पंचनाम्यांचा तिढा अजूनही कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील 88 गावांना अवकाळीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले आह़े या गावांमध्ये शेतकरी आणि पंचनामे करणारे पथक यांच्यात वाद सुरु असून सरसकट पंचनाने करण्यास पथक नकार देत असल्याने शेतकरी त्यांना शेतशिवारात घुसू देत नसल्याचे प्रकार सुरु आहेत़
नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागात यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले होत़े परंतू ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील अतीवृष्टी आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळीमुळे येथे पिकांचे नुकसान झाले होत़े न्याहली, भादवड, बलदाणे, आसाणे, घोटाणे, खोक्राळे, रनाळेसह पूर्व भागातील बहुतांश गावांमध्ये कापूस व धान्य पिकांचे नुकसान झाले आह़े परंतू या भागात 60 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस न होणे आणि नुकसान 30 टक्के असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होत़े यातून शेतक:यांनी दीड महिन्यापासून सातत्याने पावसामुळे नुकसान होत असल्याचे दर्शवून दिले होत़े दरम्यान सोमवारपासून या भागात पंचनामे करण्यासाठी पथके हजेरी देत आहेत़ परंतू शेतकरी त्यांना बांधावरुन परत पाठवत आहेत़ प्रशासनाने सातबारा उता:यावर लावलेल्या पिकपे:यावरुन सरसकट नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी शेतक:यांची आह़े तर प्रशासन पाहणी करुन पंचनामे करणार यावर अडून बसले आह़े यातून अनेक गावांमध्ये पंचनामे पूर्ण झालेले नसल्याची माहिती देण्यात आली आह़े शेतक:यांच्या म्हणण्यानुसार पावसामुळे जमिनींचा ओलावा वाढून पीकांचे नुकसान झाले आह़े यामुळे नुकसानीची टक्केवारी 60 टक्क्यांपेक्षा अधिक आह़े यानंतरही पंचनामे करताना पथकांकडून वरवर पाहून नोंदी व फोटो घेतले जात असल्याचे सांगण्यात आले आह़े
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना संपर्क केला असता त्यांनी तालुक्यात 17 गावांचे पंचनामे पूर्ण झाले असून सरसकट पंचनामे शक्यच नाहीत़ पथकांकडून नुकसानीची पाहणी करुन फोटो काढून पंचनामे करण्यात येतील असे सांगितल़े यामुळे शेतक:यांच्या अडचणी वाढल्या आहेत़