दोन राज्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची सावळदा केंद्रातही नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:56 IST2019-04-10T13:56:16+5:302019-04-10T13:56:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सिमेवरील शहरे आणि गावांमध्ये जाणावलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची सावळदा ता़ ...

दोन राज्यात जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची सावळदा केंद्रातही नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सिमेवरील शहरे आणि गावांमध्ये जाणावलेल्या भूकंपाच्या धक्क्यांची सावळदा ता़ शहादा येथील मापन केंद्रात नोंद करण्यात आली आह़े येथील नोंदीनुसार 3़5 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती देण्यात आली आह़े
सोमवारी सायंकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटांनी मध्यप्रदेशातील ब:हाणपूर, रावेर या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होत़े साधारण 3़5 रिश्टर स्केलच्या या धक्क्यांमुळे जिवितहानी झाली नसली तरी घबराट पसरली होती़ सावळदा येथील केंद्रात या धक्क्यांची तातडीने नोंद करण्यात आली होती़ केंद्राचे प्रमुख दिलीप जाधव यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी नोंद झाल्याची माहिती देत नंदुरबार जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे धक्के जाणवले नसल्याचे सांगितल़े सावळदा येथील केंद्रात दरदिवशी अधिकारी व कर्मचारी भेटी देऊन तपासणी करत आहेत़ गेल्या महिन्यात पालघर येथे केंद्र असलेले भूकंपाच्या धक्क्यांचीही येथे नोंद झाली होती़
दरम्यान सरदार सरोवराच्या पाणलोट क्षेत्रातील दबावामुळे भूगर्भातील हालचाली गेल्या काही वर्षात वाढल्या असल्याची माहिती देण्यात आली आह़े यातून महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील विविध भागात वेळावेळी भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे सांगण्यात आले आह़े