कानांना आता बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:14+5:302021-06-25T04:22:14+5:30
नंदुरबार : कोरोनानंतर आता कानांना बुरशी आणि बॅक्टेरियाचा धोका वाढला आहे. सहसा मधुमेही असलेल्यांना हा धोका सर्वाधिक असला तरी ...

कानांना आता बुरशी, बॅक्टेरियाचा धोका
नंदुरबार : कोरोनानंतर आता कानांना बुरशी आणि बॅक्टेरियाचा धोका वाढला आहे. सहसा मधुमेही असलेल्यांना हा धोका सर्वाधिक असला तरी उपचाराने बरा होणारा हा आजार असल्याने घाबरून जाण्यासारखे नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे पावसाळ्यात हा आजार काॅमन असतो, कोरोना न झालेल्यांनाही तो आढळू शकतो.
कोरोनानंतर काळी बुरशी, पांढरी बुरशीचे प्रकार समोर आले. त्यातून अनेकांना महागडा उपचारदेखील घ्यावा लागला. काहींना शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. आता हा बुरशीजन्य अर्थात म्युकरमायकोसिस आजार मागे पडत चालला आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने कानांमधील बुरशी आणि बॅक्टेरियाच्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनातून बरे झालेले परंतु मधुमेही असलेल्यांना या बुरशीला सामोरे जावे लागण्याची अधिक शक्यता असते. पावसाळ्यात असाही हा आजार सर्वसाधारण असला तरी त्यावर उपचार असल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही.