कमावलेला पैसा होतोय लॉकडाऊनमध्ये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:57 IST2020-03-30T11:57:19+5:302020-03-30T11:57:35+5:30

हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दक्षिण गुजरात व सौराष्ट्रात साखर कारखाना, गुºहाळमध्ये मजुरीसाठी स्थलांतरीत झालेले तालुक्यातील ...

Earn money is being spent in lockdown | कमावलेला पैसा होतोय लॉकडाऊनमध्ये खर्च

कमावलेला पैसा होतोय लॉकडाऊनमध्ये खर्च

हिरालाल रोकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : दक्षिण गुजरात व सौराष्ट्रात साखर कारखाना, गुºहाळमध्ये मजुरीसाठी स्थलांतरीत झालेले तालुक्यातील हजारो मजुरांचे कुटुंब लॉकडाऊनमुळे अडकले असून भविष्यासाठी कमावलेला पैसा दैनंदिन उदरनिवार्हासाठी खर्च होत आहे. त्यातच सर्व व्यवहार ठप्प झाल्याने मरणप्राय यातना सोसत असताना गावाकडे जावे तर वाहतूक बंद व वाहन मिळाले तर गुजरात पोलिसांकडून होणारी मारहाण अशा विवंचनेत सापडले आहेत.
दरवर्षी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात तालुक्यातील हजारो कुटुंब रोजगारासाठी शेजारच्या गुजरात राज्यात जातात. साधारणत: दसऱ्याला हे सर्व हंगाम संपल्यानंतर परत येतात. यंदा कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हंगाम अर्ध्यावरच बंद पडला असल्याने सर्वत्र विचित्र परिस्थिती उद्भवली आहे. तालुक्यातील म्हसावद व परिसरातील सुमारे २०० आदिवासी बांधवांचा रोजगार बंद झाला आहे. गेल्या आठ दिवसात कमावलेले पैसे संपण्याच्या मार्गावर असल्याने या सर्वांना परतीचे वेध लागले आहेत. अंंतर जास्त असल्याने पायपीट करणेही शक्य नसल्याने लोकप्रतिनिधींनी यासाठी मदत करावी, अशी आर्त विनवणी या मजुरांनी केली आहे.
लॉकडाऊनचा कालावधी कमी होण्याऐवजी आणखी वाढण्याची चर्चा या मजुरांपर्यंत पोहचली अन् या सर्वांना गावी परतण्याचे वेध लागले. त्यासाठी त्यांच्या मुकादमाने लोणखेडा, ता.शहादा येथील दत्तूभाई पाटील यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्या. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आम्हा सर्वांना गावी परतण्यासाठी मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
येथून परत येण्यासाठी अत्यावश्यक सुविधांसाठी परवानगी असलेल्या ट्रक्स व्यतिरिक्त दळणवळणाची अन्य कोणतीही साधने तलाला परिसरात नाही. त्यातील काही चालक तयार होत नाहीत तर काही अव्वाच्या सव्वा भाड्याच्या रकमेची मागणी करीत आहेत. बर तेथून एकदम सर्व न निघता दहा-दहाच्या गटाने निघालेत तरीही बहुसंख्य बांधव अशिक्षित असल्याने अनोळखी प्रदेशात रस्त्यावर पोलिसांनी अडविले तर पुढचे काय, असा प्रश्न सतावत असल्याने सर्व हतबल होऊन बसले आहेत.

दरवर्षाप्रमाणे यंदा आॅगस्ट महिन्यात तलाला, जि.जुनागड (गुजरात) परिसरात रोजगारासाठी स्थलांतरित झाले होते. तलाला तालुक्यातील तलालासह मेंदडा, सातनगीर, सुरवा, माधवपूर, बोरवाव, मानवदर, अत्तलवाडी, बारवा, उपनेता, बोरदेर आदी गाव परिसरातील गुºहाळांवर रोजंदारी करून पोटापाण्याची व भविष्याची व्यवस्था करीत होते. देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर देशात लॉकडाऊनमुळे सर्वत्र लहान-मोठे उद्योगधंदे बंद करण्यात आले. यामुळे गुजरातमधील गुºहाळ उद्योगही २२ मार्चपासून बंद आहेत. हे उद्योग पुन्हा सुरू होतील या आशेवर तलाला परिसरातील सर्व स्थलांतरीत मजूर थांबून आहेत. गुºहाळ मालकांनी तीन दिवस पुरेल एवढी शिधा दिली. मात्र त्यानंतर भविष्यासाठी बचत केलेल्या पैशांचा वापर दैनंदिन चरितार्थ चालविण्यासाठी करावा लागत आहे.

Web Title: Earn money is being spent in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.