बनावट मद्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:44 IST2019-09-26T11:44:41+5:302019-09-26T11:44:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुनी वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील घरात सुरु असलेला बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना राज्य ...

बनावट मद्याच्या कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुनी वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील घरात सुरु असलेला बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दल यांच्या संयुक्त कारवाईत उध्वस्त करण्यात आला़ पथकाने येथून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आह़े
निवडणूक आचारसंहितेच्या पाश्र्वभूमीवर अवैध मद्याची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस दलाने मोहिम सुरु केली आह़े यांतर्गत जुनी वाण्याविहिर येथे एका घरात बनावट मद्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती़ बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उत्पादन शुल्कचे निरीक्षक संजय पाटील, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्यासह पथकाने जुनी वाण्याविहिर गावातील घरावर छापा टाकला़ यावेळी घरात रिकाम्या बाटल्यांमध्ये दारु भरण्याचे काम सुरु असल्याचे पथकाला दिसून आल़े कारवाईनंतर परिसरात उपस्थित असलेल्यांची धावपळ सुरु झाली़ याठिकाणी 1 हजार 680 बनावट व्हिस्कीच्या बाटल्या, विदेशी मद्याचा तयार 200 लीटर बनावट ब्लेंड, बुच, रिकाम्या बाटल्या, पुठ्ठय़ाचे खोके आणि मद्य तयार करताना तिव्रता मोजण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 3 लाख 84 हजार 746 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ हा मुद्देमाल ताब्यात घेत याठिकाणी उपस्थित असलेल्या घरमालक महिलेस पोलीसांनी अटक केली़ कारखाना चालवणारा मुख्य सूत्रधार फरार झाल्याने पोलीसांकडून त्याचा शोध घेतला जात आह़े
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त प्राजक्ता लवंगारे, उपविभागीय आयुक्त अजरुन ओहोळ, पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परदेशी, पोलीस निरीक्षक डांगे, सहायक पोलीस निरीक्षक डी़डी़पाटील, दुय्यम निरीक्षक शैलेंद्र मराठे, जी़जी़अहिरराव, पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी, रामसिंग राजपूत, मानसिंग वळवी, संदीप वाघ, हितेश जेठे, राजेंद्र पावरा, राम वळवी, कन्हैय्या परदेशी, असमसिंग पाडवी, संगीता नाईक, ममता पाडवी यांनी केली़
पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई केलेला कारखाना रविंद्र भामटय़ा पाडवी रा़ जुनी वाण्याविहिर हा चालवत असल्याची माहिती देण्यात आली आह़े पथकाच्या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर तो घटनास्थळावरुन फरार झाला होता़ त्याची पत्नी आहलूबाई हिला पथकाने ताब्यात घेतल़े तिला दुपारी तळोदा न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह़े न्यायालयाच्या आदेशानंतर आहलूबाई हिची धुळे येथील कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े बनावट मद्याचा कारखाना नेमका कधीपासून सुरु होता यासह विविध प्रश्नांची उत्तरे मुख्य सूत्रधार रविंद्र पाडवी हा हाती आल्यानंतर पोलीसांना मिळणार आहेत़