मयत विनाअनुदानित शिक्षकाच्या मुलींच्या नावे मुदतठेवी देत फेडले ऋण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:56 IST2019-09-05T14:56:47+5:302019-09-05T14:56:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 15 वर्ष विनाअनुदानित ज्ञानदान करणारे खर्दे खुर्द ता़ नंदुरबार येथील शिक्षक जितेंद्र प्रताप पाटील ...

मयत विनाअनुदानित शिक्षकाच्या मुलींच्या नावे मुदतठेवी देत फेडले ऋण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 15 वर्ष विनाअनुदानित ज्ञानदान करणारे खर्दे खुर्द ता़ नंदुरबार येथील शिक्षक जितेंद्र प्रताप पाटील यांचा दोन आठवडय़ापूर्वी मृत्यू झाला होता़ तुटपुंज्या मानधनावर कार्य करणा:या जितेंद्र पाटील यांच्या दोन मुलींच्या नावे शिक्षण विभाग आणि शिक्षकांच्या संघटना यांनी अडीच लाख रुपयांच्या मुदतठेवी करुन देत अनोखे ऋण फेडले आहेत़ शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला ह्या मुदतठेवीच्या पावत्या त्यांच्या पत्नीच्या सुपूर्द करण्यात आल्या़
तलवाडे येथील चिराईमाता माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक जितेंद्र पाटील यांचे नुकतेच निधन झाले आह़े त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, 11 महिन्याचा मुलगा, आई असा परिवार आह़े घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी त्यांच्या कुटूंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला होता़ त्यानुसार सरलाबाई जितेंद्र पाटील यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवून 2 लाख 57 हजार मदत उभी केली गेली होती़ या मदतीचा सदुपयोग व्हावा यासाठी दोन्ही मुलींच्या नावे मुदतठेव करण्यात आली़ मुदतठेवीच्या पावत्या खर्दे खुर्द येथे जाऊन शिक्षणाधिकारी एम़व्ही़कदम, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी दिल्या़ यावेळी मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष कुंदन पाटील, कपूरचंद मराठे, महेंद्र फटकाळ, राहुल खैरनार, गोरखनाथ बोराणे, योगेश पाटील, मनोहर साळूंखे उपस्थित होत़े