क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरल्याने डंपर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST2021-06-24T04:21:23+5:302021-06-24T04:21:23+5:30

क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहन (क्रमांक एम.एच.२० इ.जी. ६६२२) नाशिक येथे जात होते. या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक वाळू ...

Dumper confiscated due to filling more sand than capacity | क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरल्याने डंपर जप्त

क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरल्याने डंपर जप्त

क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वाहन (क्रमांक एम.एच.२० इ.जी. ६६२२) नाशिक येथे जात होते. या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरल्याची शंका आल्याने पथकाने वाहन थांबवून तपासणी केली. वजन काट्यावर वजन केले असता वजन काटाच बंद पडला. त्यानंतर सदरचे वाहन मोहीदा येथील मित्तल या कंपनीचा वजन काट्यावर जाऊन वजन केले असता पावती प्रमाणे तेथे ५५ टन एवढे वजन भरणे आवश्यक असताना ते ७० टनांच्या आसपास भरले आहे. त्यात क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे १४ टन वाळू जास्त आढळून आली आहे. म्हणून वाहनाचे मालक विशाल परदेशी रा. येवला जि. नाशिक यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी शहादा तहसील कार्यालयात डंपर जमा करण्यात आला आहे.

Web Title: Dumper confiscated due to filling more sand than capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.