अमरावती नदीचे पाणी अडल्याने वैंदाणे येथील घरे व शेती पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 12:01 IST2019-09-16T12:01:11+5:302019-09-16T12:01:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प 13 वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरला आह़े यामुळे ...

अमरावती नदीचे पाणी अडल्याने वैंदाणे येथील घरे व शेती पाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प 13 वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरला आह़े यामुळे नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील वैंदाणे परिसरातील घरे आणि शेतांमध्ये अमरावतीचे पाणी शिरले आह़े प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतक:यांची आह़े शेतक:यांनी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले आह़े
निवेदनात, मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प 13 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर पूर्ण क्षमतेने भरला आह़े प्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा झाला आह़े अद्यापही या भागात पाऊस सुरु असल्याने पाणलोट क्षेत्रात वाढ होऊन पाण्याचा फुगवटा निर्माण झाला आह़े
13 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती़ त्यानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पावसाने हजेरी दिली नसली तरी प्रशासनाने निवेदने देऊनही शेतक:यांच्या अडचणीची दखल घेतली नव्हती़ वैंदाणे परिसरात निर्माण होणा:या पाण्याच्या फुगवटय़ामुळे शेतीचे नुकसान होत आह़े घरांमध्ये साप, विंचू, किडे, डास यांची संख्या वाढून घरांच्या परिसरात ओलावा वाढला आह़े अनेक ठिकाणी पाणी येत असल्याने या मातीच्या घरांच्या भिंती कोसळत आहेत़ ही घरे बुडीत क्षेत्रात असतानाही योग्य ती कारवाई झालेली नाही़ प्रशासनाने याबाबत दखल न घेतल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार ग्रामस्थ करत असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आह़े
निवेदनावर वैंदाने गावचे सरपंच संजय रावण पाटील, चिंधु कुवर, पंढरीनाथ पाटील, शंकर धनगर ,जगन्नाथ पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत़
मालपूर मध्यम प्रकल्पाची क्षमता ही 225़50 मीटर आह़े याठिकाणी यंदा तेवढय़ाच क्षमतेने पाणी असून प्रकल्प 95़25 टक्के भरल्याची माहिती धुळे मध्यम प्रकल्प विभागाने दिली आह़े