महसूल विभागातील रिक्त पदांमुळे सामान्यांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:08 IST2019-06-11T12:08:16+5:302019-06-11T12:08:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : उपजिल्हाधिका:यांच्या 6 रिक्त पदांमुळे जिल्हा प्रशासनाचे कामकाज मंदावले आह़े यातच 31  मे अखेरीस महसूल ...

Due to vacant positions in revenue department, | महसूल विभागातील रिक्त पदांमुळे सामान्यांची परवड

महसूल विभागातील रिक्त पदांमुळे सामान्यांची परवड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : उपजिल्हाधिका:यांच्या 6 रिक्त पदांमुळे जिल्हा प्रशासनाचे कामकाज मंदावले आह़े यातच 31  मे अखेरीस महसूल विभागातून जिल्हा व तालुकास्तरावर 50 लिपिकवर्गीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने कामकाजावर परिणाम होऊन सामान्य माणसाची परवड होत आह़े 
सामान्य माणसांचा महसूल विभागासोबत दैनंदिन संबध गेल्या काही वर्षात अधिक दृढ झाला आह़े संजय गांधी निराधार योजना ते विविध दाखल्यांर्पयत तलाठी ते नायब तहसीलदार यांच्याकडे वेळोवेळी जावे लागत आह़े परंतू 31 मे पासून गेल्या 10 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालय ते तालुकास्तरावर तहसील कार्यालय याठिकाणी विविध पदे रिक्त किंवा बदल्या झाल्याने समस्या निर्माण होत आह़े दुर्गम भागात मंडळाधिका:यांसह थेट अव्वल कारकूनार्पयत पदे आहेत़ विशेष म्हणजे 50 पेक्षा अधिक मंडळाधिकारी, अव्वल कारकून आणि नायब तहसीलदार हे बदलीस पात्र आहेत़ 
महसूल विभागाने नुकतीच सेवानिवृत्त आणि बदलीपात्र कर्मचा:यांच्या याद्या जाहिर केल्या आहेत़ यात नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळवहिवाट शाखा, सरदार सरोवर प्रकल्प विभाग, निवडणूक शाखा येथे प्रत्येकी एक नायब तहसीलदार, शहादा येथे महसूल, निवडणूक, पुरवठा निरीक्षण अधिकारी व संजय गांधी रोजगार योजनेचे नायब तहसीलदार यांची सात पदे रिक्त आहेत़ तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा निरीक्षण अधिकारी हे पदही रिक्त आह़े जिल्हा व तालुकास्तरावर रिक्त पदांमुळे कामकाजात अडचणी येत असल्याचे चित्र आह़े
प्रशासकीय कामकाजाचा कणा असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचा:यांची पदेही रिक्त झाल्याने कामकाज संथावले आह़े धडगाव तहसील कार्यालयात अव्वल कारकूनाची दोन पदे रिक्त आहेत़ सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात पालिका, अल्पसंख्यांक सामान्य शाखा, गृह शाखा, आस्थापना आदी पाच ठिकाणी, अप्पर जिल्हाधिकारी सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयात 3, तळोदा येथील उपविभागीय कार्यालयात 2, नंदुरबार व नवापूर तहसील येथे प्रत्येक 1 तर शहादा तहसील कार्यालयात संजयगांधी योजनेचे 2 अशा 13 अव्वल कारकूनांची पदे रिक्त आहेत़ एकूण 15 रिक्त असल्याने इतर कर्मचा:यांचा कामाचा बोजा वाढवण्यात आला आह़े याशिवाय जिल्हा प्रशासनात काम करणारे 21 अव्वल कारकूल बदलीस पात्र आहेत़ त्यांच्या बदल्या झाल्यानंतर काय, असा प्रश्न उपस्थित होतो आह़े लिपिक वर्गीय कर्मचा:यांच्या बाबतही ब:याच अडचणी असल्याचे चित्र आह़े धडगाव तहसीलदार कार्यालयात 4, जिल्हाधिकारी कार्यालयात 3, ससप्र, गा:हाणे निराकरण, पुरवठा, तळोदा ससप्र येथे प्रत्येक या प्रमाणे 14 तर विविध आस्थापनेतील 33 लिपिक बदलीस पात्र आहेत़ नियुक्त जागी तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े यातील काहीजण जिल्हा बदल करुन तर काही जण जिल्हांतर्गत बदली करुन जाणार असल्याचे सांगण्यात आले आह़े 
 

Web Title: Due to vacant positions in revenue department,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.