वाहतूक वळविल्याने प्रवाशांना आर्थिक भरुदड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 12:04 IST2019-06-22T12:04:36+5:302019-06-22T12:04:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक म्हसावदमार्गे वळविण्यात आली आहे. ...

Due to transport, the financial burden of passengers | वाहतूक वळविल्याने प्रवाशांना आर्थिक भरुदड

वाहतूक वळविल्याने प्रवाशांना आर्थिक भरुदड

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक म्हसावदमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहादाकडून जाणारे तसेच खेतियाकडून शहाद्याला जाणा:या प्रवाशांना दुपटीचे प्रवास भाडे द्यावे लागत आहे. 
सविस्तर वृत्त असे की, कोळदा-खेतिया मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. ब्राrाणपुरी गावात खोलीकरणाचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांमुळे गावात मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असल्याने ब्राrाणपुरीकडून खेतियाकडे जाणारी तसेच शहादाकडे जाणारी अवजड व प्रवाशी वाहतूक करणारी वाहने म्हसावदमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणा:या चालकांनी प्रवासभाडे दुपटीने वाढवल्याने त्याचा भरुदड प्रवाशांना सहन करावा लागत आहे .
बससेवा बंद झाल्याने 
विद्याथ्र्याचे हाल
ब्राrाणपुरी येथे रस्ता रुंदीकरणामुळे रस्ता पूर्ण खोदण्यात आल्याने बस सेवा बंद करण्यात आले आहे. सध्या शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने विद्याथ्र्याना खाजगी वाहतुकीचा सहारा घेत प्रवास करावा लागत असून आर्थिक फटकाही बसत आहे. संबधित ठेकेदाराने अवजड वाहने म्हसावदमार्गे सोडून बसेस व प्रवासी वाहतूक करणा:या वाहनांना ब्राrाणपुरीमार्गे जाण्याची सोय करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Due to transport, the financial burden of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.