प}ीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने संतापात घरच जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 11:46 IST2019-06-01T11:41:23+5:302019-06-01T11:46:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प}ीवर चारित्र्याचा संशय घेवून पतीने रागाच्या भरात घरच जाळून टाकल्याची घटना मनखेडी, ता.धडगाव येथे ...

प}ीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने संतापात घरच जाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प}ीवर चारित्र्याचा संशय घेवून पतीने रागाच्या भरात घरच जाळून टाकल्याची घटना मनखेडी, ता.धडगाव येथे घडली. संशयीत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुलाबसिंग सेल्या वळवी, रा.मनखेडी, ता.धडगाव असे संशयीताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, गुलाबसिंग वळवी हा पत्नीवर नेहमीच चारित्र्याचा संशय घेत होता. यामुळे तो दारूच्या आहारी देखील गेला होता. 29 रोजी दारूच्या नशेतच त्याने प}ीशी वाद घालून थेट घरच जाळून टाकले.
यात लाकडी घर व घरातील सर्व सामान असा एकुण एक लाख 27 हजार रुपयांचा ऐवज जळून खाक झाला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली.
याबाबत प}ीच्या फिर्यादीवरून गुलाबसिंग सेल्या वळवी याच्याविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार अभय मोरे करीत आहे. संशयीताला लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती धडगाव पोलिसांतर्फे देण्यात आली.