घराच्या जागेच्या हिस्से वाटणीवरून धानो:यात दोघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 12:49 IST2018-07-02T12:49:23+5:302018-07-02T12:49:45+5:30

Due to sharing the space of the house, the two people will be beaten | घराच्या जागेच्या हिस्से वाटणीवरून धानो:यात दोघांना मारहाण

घराच्या जागेच्या हिस्से वाटणीवरून धानो:यात दोघांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घराच्या हिस्से वाटणीवरून धानोरा ता़ नंदुरबार येथे तिघांना मारहाण करण्याची घटना 30 जून रोजी घडली होती़ मारहाणीतील जखमींवर उपचार करण्यात येत आह़े
धानोरा गावात विजय शरद वसावे व रणजित अमरसिंग वसावे यांच्यात घराच्या जागेच्या हिस्से वाटणीवरून वाद सुरू होता़ परंतू वाटणीबाबत समझोता न झाल्याने शुक्रवारी रणजित पाडवी व संजय रणजित पाडवी या दोघांनी विजय वसावे यांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली़ यावेळी बचावासाठी आलेल्या सुरेखा विजय वसावे, शबरीबाई शरद वसावे तिघे रा़ कावठाफळी यांनाही मारहाण केली़ लाकडी काठीच्या सहाय्याने झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाल़े याबाबत सुरेखा अमरसिंग वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात रणजित व संजय पाडवी दोन्ही रा़ ईसाईनगर या दोघांविरोधात मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

Web Title: Due to sharing the space of the house, the two people will be beaten