Vidhan Sabha 2019: खराब रस्त्यांमुळे बस ऐवजी जीप केल्या अधीग्रहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:04 IST2019-10-10T12:01:18+5:302019-10-10T12:04:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मतदान यंत्र पोहचविणे आणि आणण्यासाठी 31 बसेस आणि 66 जीप अधीग्रहीत करण्यात आल्या आहेत. ...

Vidhan Sabha 2019: खराब रस्त्यांमुळे बस ऐवजी जीप केल्या अधीग्रहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मतदान यंत्र पोहचविणे आणि आणण्यासाठी 31 बसेस आणि 66 जीप अधीग्रहीत करण्यात आल्या आहेत. दीड हजारापेक्षा अधीक मतदान असलेल्या चार केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्र राहणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.
निवडणूक तयारी विषयी माहिती देतांना डॉ.चेतन गिरासे यांनी सांगितले, मतदार संघात एकूण मतदान केंद्र 339 आहेत. ज्या ठिकाणी दीड हजारापेक्षा जास्त मतदार असतील अशा चार मतदान केंद्रांवर सहाय्यकारी मतदान केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार आहे. शहाद्यातील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयात एक सखी मतदान केंद्र राहाणार असुन तेथे केवळ महिला कर्मचारी नियुक्त असतील. मतदान केंद्रावर कर्मचारी आणि साहित्य पोहचविण्यासाठी 31 बसेस तर 66 जिप असणार आहेत. काही ठिकाणी पाऊस झाल्याने बसेस पोहचु शकणार नाही त्यामुळे जिप वाढविण्यात आल्या आहेत.
शहादा मतदार संघात एकुण 3 लाख 20 हजार 273 मतदार असुन 1 लाख 61 हजार 648 पुरुष तर 1 लाख 18 हजार 620 स्री मतदार आहेत. दिव्यांग मतदार 876, तृतीय पंथी पाच तर 146 सैनिक मतदार असल्याची माहिती गिरासे यानी दिली. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी शाळा कॉलेज मधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत तर काही ठिकाणी सामाजिक सस्था पथनाट्य सादर करत आहेत. नगरपालिकेचा घंटा गाडीवर देखील बॅनर लावण्यात आले आहे. मतदानाचा दिवशी जवळपास 35 मतदान केंद्रात वेब कास्टींग करण्यात येणार असल्याचे डॉ.गिरासे यांनी सांगितले.