मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात ‘दाणादाण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:01 IST2019-06-12T12:01:27+5:302019-06-12T12:01:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वा:यासह जोरदार हजेरी लावली़ मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या ...

मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात ‘दाणादाण’
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने वादळी वा:यासह जोरदार हजेरी लावली़ मंगळवारी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची एकच धावपळ उडाली होती़ वादळामुळे वीज वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा बंद झाला होता़ रात्री उशिरार्पयत जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अंधार होता़
नंदुरबार
शहरात सायंकाळी सहा वाजेपासून वादळी वारे सुरु झाले होत़े यामुळे जागोजागी झाडे कोसळली़ सायंकाळची वेळ असल्याने नेहरु चौकासह बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होती़ अचानक सुरु झालेल्या वादळामुळे भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाल़े शहरात सुमारे पाऊण तास पावसाच्या सरी कोसळत होत्या़ यामुळे मंगळबाजार, भोई गल्ली, नेहरु चौकातील तालुका क्रीडा संकुलाचे मैदान यासह ठिकठिकाणी पाणी निघण्यास जागा नसल्याने गुडघ्यार्पयत पाणी साचले होत़े शहराला लागून असलेल्या गुरुकुल नगर-2 येथे वीज तारांवर झाडाची फांदी कोसळल्याने वीज तारा तुटल्या होत्या़ धुळे चौफुली, लालबाग कॉलनी, मोठा मारुती चौक, तसेच बाजार समिती जवळ झाडांच्या फांद्या आणि साईन बोर्ड तुटून पडले होत़े शहरात ब:याच ठिकाणी वीज तारा तुटल्याची माहिती मिळाल्यानंतर वीज कंपनीच्या अधिका:यांनी तातडीने पथके नियुक्त करत कामांना सुरुवात केली आह़े
दरम्यान नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे महारु मकडू पवार, मगन बका पवार, भु:या सखाराम बागुल यांच्या घराचे पत्रे उडाल्याने संसार उघडय़ावर पडले होत़े समशेरपूर येथे युवराज कुवर, भाईदास कुवर यांच्या घरावर निंबाचा मोठा वृक्ष कोसळल्याने घराचे नुकसान झाल़े याच परिसरात विठोबा मोतीराम जाधव यांच्या घराचे पत्रे उडाल्याने नुकसान झाल़े पश्चिम पट्टय़ातील गावांमध्येही नुकसान झाल्याची माहिती आह़े
शहादा शहरात सायंकाळी साडेसात वाजता रिपरिप पावसाला सुरुवात झाली होती़ वादळीवा:यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता़ बामखेडा, सारंगखेडा परिसरातील गावांमध्ये उशिरार्पयत विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे सुरु होत़े तळोदा शहर आणि परिसरात सायंकाळी साडेसहा पासून पावसाला सुरुवात झाली होती़ वादळामुळे वृक्ष उन्मळून पडली होती़ काही ठिकाणी तारा तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला होता़ तसेच नवापूर शहरात सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या़ रात्री उशिरार्पयत जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांची धावपळ सुरु होती़ विसरवाडी, चिंचपाडा, खांडबारा येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या होत्या़ धडगाव शहर आणि दुर्गम भागात दीड तास मुसळधार पाऊस सुरु होता़ यामुळे आमचूर उत्पादकांचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आह़े
जोरदार पावसाच्या सरींनी दिवसभर होणा:या असह्य उकाडय़ामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता़ नंदुरबार शहरात पाऊस आणि वारा दोघांचा सारखाच जोर असल्याने पत्र्याचे शेड, टप:यांवर लावलेले कापड व प्लास्टिक उडाले होत़े नेहरु चौकातील बाजारात भाजीपाला विक्रेत्यांनी केलेले शेड पूर्णपणे तुटून पडले होत़े जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारातील झाड कौलारु इमारतीवर कोसळल्याने नुकसान झाल़े इमारतीत कोणीही हजर नसल्याने जीवीतहानी टळली़ पहिल्याच पावसात वीज कंपनीच्या मान्सूनपूर्व कामांचे वाभाडे निघाल्याचे दिसून आल़े नंदुरबार शहर आणि ग्रामीण वरील सर्व फिडर एकाच वेळी बंद पडल्याने तालुका अंधारात होता़