नियोजनाअभावीच शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:26 IST2019-07-28T12:25:47+5:302019-07-28T12:26:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गळती न रोखणे, धरणातील गाळ न काढणे यासह इतर नियोजन शून्य कारभारामुळेच शहरवसीयांवर पालिकेने ...

नियोजनाअभावीच शहरवासीयांना दोन दिवसाआड पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गळती न रोखणे, धरणातील गाळ न काढणे यासह इतर नियोजन शून्य कारभारामुळेच शहरवसीयांवर पालिकेने दोन दिवसाआड पाणी पुरवठय़ाची वेळ आणल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे.
विरचक धरणात पाणी नसल्यामुळे पालिकेतर्फे 1 ऑगस्टपासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशी घोषणा आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे. त्यावर विरोधकांनी टिका केली. त्यात म्हटले आहे की, पालिकेने यापूर्वीच 24 तास पाणी पुरवठय़ाची घोषणा केली आहे. असे असतांना उलट दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागत आहे.
पालिकेने नळांना तोटय़ा न बसविणे, फुटलेल्या जलवाहिन्या दुरूस्त न करणे, धरणातील गाळ न काढणे, पाण्याच्या टाक्या भरून वाहने असे प्रकार होत असल्यामुळे पाण्याची नासाडी झाल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर शहरवासीयांवर ही वेळ आली नसती असेही विरोधकांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.