दुष्काळामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात केवळ 25 टक्के क्षेत्रावर तेलबिया पिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 12:19 IST2019-06-15T12:19:19+5:302019-06-15T12:19:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळामुळे उन्हाळ्यात लागवड होणा:या तेलबिया पिकांचे क्षेत्र घटल्याने जिल्ह्यात यंदा तेलबिया उत्पादन नावालाच राहण्याची ...

Due to drought, the oilseed crop in the district this year is only 25% | दुष्काळामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात केवळ 25 टक्के क्षेत्रावर तेलबिया पिके

दुष्काळामुळे जिल्ह्यात यंदा उन्हाळ्यात केवळ 25 टक्के क्षेत्रावर तेलबिया पिके

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुष्काळामुळे उन्हाळ्यात लागवड होणा:या तेलबिया पिकांचे क्षेत्र घटल्याने जिल्ह्यात यंदा तेलबिया उत्पादन नावालाच राहण्याची चिन्हे आहेत़ यंदा केवळ 25 टक्के क्षेत्रात तेलबिया पिके असून भूईमूग केवळ नावालाच पेरण्यात आल्याचे चित्र आह़े 
नंदुरबार जिल्ह्यात मार्च-एप्रिल महिन्यात भूईमूगाची पेरणी करण्यात येत़े सरासरी 5 हजार 660 हेक्टर क्षेत्रात भूईमूगाचा पेरा होतो़ परंतू यंदा पाण्याअभावी केवळ 1 हजार 418 हेक्टर क्षेत्रात भूईमूग पेरणी शक्य झाली होती़ केवळ 21 टक्के झालेल्या या पेरणीनंतर अनेक ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाल्याने भूईमूग उत्पादनावर संक्रांत येण्याची शक्यता आहेत़ नंदुरबार तालुक्याच्या पश्चिम पट्टा, नवापुर आणि तळोदा तालुक्यात भूईमूग पेरा झाल्याची माहिती आह़े यातील नंदुरबार आणि तळोदा तालुक्यात पिकाला पाणी देण्यासाठी शेतक:यांची प्रचंड कसरत होत आह़े 
भूईमूगानंतर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 260 हेक्टर क्षेत्रात सूर्यफूलाची लागवड करण्यात येत होती़ परंतू यंदा एप्रिल अखेरीस केवळ 70 हेक्टर क्षेत्रात सूर्यफुल लागवड करण्यात आली होती़ प्रामुख्याने अक्कलकुवा तालुक्यात सूर्यफुलाची लागवड झाली आह़े पाण्याची कमतरता असल्याने उन्हाळ्यात तीळ पेरणी करण्याकडेही दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात उन्हाळी भूईमूगाचे लागवड क्षेत्र सातत्याने घटत आह़े गेल्यावर्षात 47 टक्के उन्हाळी भूईमूग लागवड झाल्याची माहिती आह़े यंदा त्याच्या निम्मेच क्षेत्र झाल्याने येत्या काळातील या पिकाचे अस्तित्त्व धोक्यात आले आह़े नवापुर आणि नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक उन्हाळी भूईमूग पिकवला जातो़ गत पाच वर्षात नंदुरबार तालुक्यातील क्षेत्र दोन हजार हेक्टरने कमी झाले आह़े 

Web Title: Due to drought, the oilseed crop in the district this year is only 25%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.