शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

खरडी नदीवरील पूल ठरतोय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 13:27 IST

तळोदा : दोन्ही कठडे नसल्याने शहरातील वाहतुकीला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील खरडी नादीवरील पुलाची अत्यंत दुरावस्था झाली असून, पुलाचे दोन्ही कठडेदेखील नसल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी अक्षरश: धोकेदायक ठरला आहे. सबंधीत यंत्रणेने या प्रकरणी गंभीरदखल घेवून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आहे.तळोदा शहरातील खरडी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी पूल उभारला आहे. गेल्या 30 ते 35 वर्षापासूनचा हा पूल आहे. परंतू बांधल्यापासून तर अद्यापपावेतो त्याची एकदाही दुरुस्ती अथवा डागडूजी झालेली नाही. त्यामुळे या पुलाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. तसेच ठिक ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहे. एवढेच नव्हे तर दोन्हीं बाजूचे कठडे सुध्दा तुटले आहे. त्यामुळे पुलावरची वाहतूक अक्षरश: धोकेदायक बनली आहे. याठिकाणी कठडे नसल्यामुळे येथून वाहन काढत असताना पादचा:यांना जीव मुठीत घेवून मार्गक्रमण करावे लागत असते. शिवाय याठिकाणी वाहनचालक ही बेदकारपणे वाहने चालवित असतात. अशावेळी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नकारता येत नाही. तीन दिवसापूर्वी येथून दोन भरधाव वेगातील चारचाकी वाहने निघत असतांना पूलाखाली पडताना वाचल्याचे प्रत्यक्ष दर्श्ीनी सांगितले. वास्तविक हा अत्यंत जूना पूल झाला असून, सबंधित यंत्रणेने स्ट्ररल ऑडिटदेखील केले आहे. मात्र अजून ही त्याची नूतनीकरण, दुरुस्ती अथवा डागडूजीबाबत कुठलेही पाऊल उचलले जात नाही. संबंधित विभागाच्या उदासीन धोरणाबाबत येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या पुलाच्या पलीकडे आदिवासी वसाहत आहे. या नागरिकांना पूला वरुनच ये-जा करावी लागत असते. शिवाय अक्कलकुवा रस्त्याकडे जाणारी चारचाकी वाहने या पूला वरुनच जात असतात. त्याच बरोबर शेतकरी ही जातात. साहजिकच पूलावर वहनानांची मोठी वर्दळ होत असते. ही वस्तुस्थिती लक्षात घेवून पूलाची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. परंतू याकडे लोकप्रतिनीधींनी सुध्दा दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. निदान सबंधित विभागाने रायगड येथील सावित्री पूलाची दुर्घटना टाळण्यासाठी या पूलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे