राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 12:49 IST2020-02-01T12:49:12+5:302020-02-01T12:49:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बँकांचे व्यवहार शुक्रवारपासून बंद झाले़ संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प ...

Due to the closure of nationalized banks, financial transactions in the district are stalled | राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार ठप्प

राष्ट्रीयकृत बँकांच्या संपामुळे जिल्ह्यातील आर्थिक व्यवहार ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बँकांचे व्यवहार शुक्रवारपासून बंद झाले़ संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून तीन दिवस ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे़ दरम्यान बँक कर्मचाऱ्यांनी आपआपल्या बँक शाखांसमोर शुक्रवारी दुपारी निदर्शने करत मागण्यांचा पुनरुच्चार केला़
२० टक्के वेतनवाढीच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला होता़ संपात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ११ राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत़ शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस हा संप असून रविवारी नियमित सुटीमुळे बँका बंद राहणार आहेत़ परिणामी सलग तीन दिवस बँकांची सुटी असल्याने सामान्यांसह व्यापारी वर्गाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे़
देशातील राष्ट्रीयकृत बँक कर्मचाºयांच्या वेतन सुधारणेच्या प्रलंबित मागण्यांवर कोणतीही सहमती न झाल्यामुळे बँक कर्मचारी संघटनांनी शुक्रवार व शनिवारी दोन दिवसीय संप पुकारला आहे. नवीन वेतन श्रेणी १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू होणे गरजेचे असतांना सत्तावीस महिन्यांच्या वाटाघाटी नंतरही तोडगा निघालेला नाही. पाच वर्षांपासून सरकारने राबवलेल्या योजनांमुळे बँकांच्या कर्मचाºयांवरील कामाचा बोजा वाढला आहे़ यामुळे वेतनात वाढ करण्याची संघटनांची मागणी आहे़
संपात जिल्ह्यातील सर्वच बँक कर्मचाºयांनी सहभाग घेतल्यामुळे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार थंडावले आहे़ शहरातील स्टेट बँक, देना बँक, युनियन बँक, बडोदा बँक, सेंट्रल बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा या बॅकांच्या कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतला़ संपामुळे बँकेच्या ग्राहकांचे हाल झाल्याचे दिसून आले. संपाची माहिती नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले़
सकाळी ११ वाजता स्टेट बँकेसमोर कर्मचाºयांनी निदर्शने करत सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ यावेळी सुजाता जैन, अब्दुल रहिम, विलास मुळे, विकास सौंदाणे, कुलदीप कुमार, अजित कुमार, हर्षद कुमार, रोशन वसावे, मनोज पिंपळे, राजू शिरसाळे, कैलास सामुद्रे आदी उपस्थित होते़

Web Title: Due to the closure of nationalized banks, financial transactions in the district are stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.