बदलत्या वातावरणामुळे तळोदा व शहाद्यातील पिक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 19:33 IST2019-02-17T19:33:03+5:302019-02-17T19:33:11+5:30
तळोदा/शहादा : उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत

बदलत्या वातावरणामुळे तळोदा व शहाद्यातील पिक धोक्यात
रांझणी : सततच्या वातावरणातील बदलांमुळे तळोदा तालुक्यातील ऊस पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झालेली आहे़ हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत असल्याची स्थिती आहे़
सध्या तळोदा व शहादा तालुक्यातील ऊस पिकांवर पांढरी माशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत आहे़ याचा परिणाम उसाच्या उत्पादन क्षमतेवर होईल या भितीपोटी ऊस उत्पादक शेतकरी भितीग्रस्त झाला आहे़ पांढरीमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेकºयांनी जैविक व रासायनिक नियंत्रण पध्दतीचा अवलब करुन आपले आर्थिक नुकसान टाळावे असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे़ कधी थंडीची लाट तर कधी ढगाळ हवामानामुळे वातावरणात वारंवार बदल घडून येत आहेत़ वातावरणातील बदलामुळे जैविक किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे़ त्याचा फटका शहादा तळोदा तालुक्यातील ऊस पिकावर होऊन पांढºया माशीचा प्रादुर्भावामुळे ऊस पिको मोठ्या प्रमाणावर नुसासानीची शक्यता वर्तविण्यात येत आहे़ पांढºया माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऊस उत्पादक शेतकºयांनी जैविक व रासायनिक नियंत्रण पध्दतीचा अवलंब करणे फायदेशिर ठरणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे़ जैविक पध्दतीने किड नियंत्रण करण्यासाठी क्रायसोपा अंडीपूंज दोन हजार प्रति एकरी सोडावित असा सल्ला देण्यात येत आहे़
सध्या बहुतेक ठिकाणी उस तोडणीवर आलेला आहे़ तर काही ठिकाणी उसाची वाढ होत आहे़ आधीच अल्प पावसामुळे उसासह इतर रब्बी पिकांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे़ पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटल्याने शेतकºयांचा उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़ त्यातच आता बदलत्या हवामानाचा फटका उसाला बसत असल्याने तोडणीवर आलेला उसाचा दर्जा खालावत असल्याने त्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे़ किड नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे़